परभणी (प्रतिनिधी)
जात,धर्म, पंत यांचा कधीच विचार केला नाही, माणुसकी हा आपला धर्म आहे. माणुसकी जपली पाहिजे, म्हणुन आयुष्यभर माणुस जोडणारा व्यक्ती म्हणुन प्राचार्य डॉ. शिवाजी दळणर यांचे नाव घेतले जाते, असे प्रतिपादन कमलताई जामकर महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत भोसले यांनी केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात प्राचार्य डॉ. शिवाजी दळणर यांच्या सेवानिवृत्त कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी प्राचार्य दीनानाथ फुलवाडकर हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणुन अॅड. शिवाजी हाके, सुभाषराव हाके, संभाजीराव धुळगुंडे, अॅड. रंगनाथ राठोड, दत्ता मायंदळे, राष्ट्र्रवादीचे युवा नेते कृष्णा दळणर यांची उपस्थिती होती. मान्यवरांनी कै.विठलदादा व साळुबाई दळणर यांच्या प्रतिमेचे पुजन केले. मान्यवरांनी व विद्यालय, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांच्यावतीने उपप्राचार्य डॉ. उत्तम देवकते व प्रा डॉ. दिपाली पांडे यांनी प्राचार्य डॉ. शिवाजी दळणर मधुमाला दळण यांचा सहपत्नीक सत्कार करण्यात आला.

प्राचार्य डॉ. शिवाजी दळणर यांच्या सेवानिवृत्तीनिमित्य प्रा डॉ. संतोष हंकारे, डॉ. बालाजी शिंदे संपादीत ‘कर्मयोगी” प्राचार्य डॉ. शिवाजी दळणर सेवानिवृत्ती गौरवग्रंथ मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला. कार्यक्रम सोशल डिस्टन्ंिसगचे नियम पाळून घेण्यात आला. यावेळी प्राचार्य भोसले म्हणाले, त्यांना कसलिही पाश्र्वभूमी, राजकीय वरदहस्त, आर्थिक समृध्दी नव्हती तरी त्यांनी आत्मनिर्भता, आत्मविश्वास, दुढनिश्च्य यांच्या बळावर यशाची पायरी गाठली. एक प्राचार्य ते एक अष्टपैलू राजकारणी म्हणून नावलौकिक मिळवला.ते निर्भिडपणे बोलतात. परखड विचार मांडणे हा त्यांचा स्वभाव आहे. ते उत्तम राजकारणी, प्रशासक,समाजकारणी, संघटक, कुंटुबवत्सलही आहेत.त्यांनी समाजातील अनेक गरिबांना मदत केली. विद्याथ्र्यांना मदतीचा हात दिला. त्यामुळे त्यांचा महाराष्ट्र्रात नावलौकिक असल्याचे त्यांनी सांगितले.
फुलवाडकर म्हणाले, शिक्षण क्षेत्रात दळणर यांनी आपले नाव रेखीवपणे कोरले. त्याचबरोबर समाजकारणातही त्यांनी आपली घौडदौड सुरुच ठेवली आहे. त्यांच्या कार्यात गावात व्याख्यानमाला राबविणे, नविन-नविन उपक्रम राबविणे, संत गाडगेबाबाचे विचार ग्रामीण भागात मांडण्याचे प्रयत्न दळणर यांनी केले. त्यांच बरोबर सत्ताधिष्ठित न्यायाची, बंधुतेची एकतेची स्थापना करुन संबंधिताचे परम कर्तव्य केले. त्यांची भुमिका कोणोही नाकारु शकत नाही. कमी कालावधीमध्ये मोठे कार्य केले, असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी उपप्राचार्य डॉ. उत्तम देवकत्ते, प्रा. डॉ. कालिदास गुडदे, लक्ष्मण पोले, प्रा. ज्ञानेश्वर खोमणे, प्रा. डॉ. विजयकुमार सोन्नर, दत्ता मायदळे, किशनराव वळसंगीकर, अॅड. शिवाजी हाके यांनी मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा. डॉ. उत्तम देवकते तर सुत्रसंचलन प्रा. डॉ. नरसिंगदास बंग यांनी केले. संपादकीय मनोगत प्रा. डॉ. सतोष हंकारे यांनी मानले. या कार्यक्रमाला शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व माजी विद्यार्थी हजर होते.

No comments:
Post a Comment