पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील
राष्ट्रीय सेवा योजनाच्या वतीने “शाश्वत विकासासाठी युवक : जलसंधारण व्यवस्थापन आणि ओसाड भूमी विकासावर
विशेष भर” या विशेष वार्षिक शिबीराचे उद्घाटन प्रसंगी ते
बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रेणुकादास
बोनर यांची उपस्थिती होती तर प्रमुख उद्घाटक म्हणून संस्थेचे सचिव कृष्णाभैया
शिवाजीराव दळणर यांची उपस्थिती होती. प्रमुख उपस्थिती
म्हणून ईळेगाव येथील सरपंच प्रभावती मारोतराव काळे, उपसरपंच
गोदावरी मारोतराव धापसे, मुख्याध्यापक आर डी आचार्य,
प्रा. डॉ. प्रकाश सुर्वे, ज्ञानदेव धापसे सर ,
शालेय समितीचे अध्यक्ष माधव धापसे आदींची उपस्थिती होती.
यावेळी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. त्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन संपन्न झाले.
यावेळी चौधरी म्हणाले,“ग्रामीण भागातील सुधारणा आणि आर्थिक सामाजिक दृष्ट्या कमजोर असलेल्या नागरिकांच्या विकासाची कामे, यावर विद्यार्थ्यांनी भर दिला पाहिजे,असेही त्यांनी सांगितले. यावेळी संस्थेचे सचिव कृष्णा दळणर म्हणाले, विद्यार्थी हा समाजाच्या गरजा ओळखून काम करण्यासाठी पुढे येतो. तो खरा समाजसेवक म्हणावा लागेल. राष्ट्रीय सेवा योजना हे सामाजिक कार्य नाही तर आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास घडविणारा एक अनुभव असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी प्राचार्य बोनर म्हणाले,“ राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून आपण आपल्या देशाच्या विकासामध्ये सक्रिय योगदान देण्याचे काम युवकांनी केले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी विविध मान्यवरांची भाषणे झाली. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी बालाजी शिंदे यांनी केले तर सूत्रसंचालन संगीत विभागाच्या दिपाली पांडे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. अंगद गडमे यांनी मानले या कार्यक्रमाला स्वयंसेवक आणि ग्रामस्थ पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


No comments:
Post a Comment