Saturday, December 13, 2025

230 रुग्णांनी घेतला मोफत आरोग्य तपासणीचा लाभ

राणीसावरगाव (प्रतिनिधी):  पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने मोजे येळेगाव येथे विशेष वार्षिक शिबिरात मोफत आरोग्य तपासणी व मोफत नेत्र तपासणी शिबिराला 230  रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. या तपासणीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. 

माधवबाग तर्फे हृदयाची ठोके, रक्तदाब, वजन तपासणी, शुगर तपासणी, शरीर तापमान तपासणी, छातीची पट्टी तपासणी, शरीरातील ऑक्सिजन तपासणी, आहार विषयक सल्ला अशा विविध मोफत तपासण्या करण्यात आल्या आहेत. या शिबिरात 100 रुग्णांनी लाभ घेतला आहे तर मोफत नेत्र तपासणीत  130 रुग्णांनी लाभ घेतला.  डॉ. कुलकर्णी, डॉ. सावंत आदींनी काम पाहिले. या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, डॉ अंगद गडमे, प्रा. विजयकुमार पवळे, कपिल लामतुरे आदींनी केले आहे.



No comments:

Post a Comment

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात ९८ जणांची सुरक्षा रक्षक पदासाठी निवड

राणीसावरगाव (प्रतिनिधी) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, विद्यार्थी विकास समिती आणि एस. एस. सिक्यु...