Wednesday, January 24, 2018

अनुदान आयोगाची नेट परीक्षा ८ जुलैला

राणीसावरगाव (गंगाधर गव्हाने)
   केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाकडून (सीबीएसई) सहाय्‍यक प्राध्यापक पदासाठी घेतली जाणारी राष्‍ट्रीय पात्रता परीक्षा (युजीसी नेट) आता ३०० गुणांची (१५० प्रश्‍न) असणार आहे. माध्यमिक शिक्षण बोर्डाने परीक्षेच्या स्‍वरूपात काही बदल केले असून, ज्युनिअर रिसर्च फेलोशिपसाठी वयाची अटही दोन वर्षांनी शिथिल करण्यात आली आहे. याबाबतचे परीपत्रक 'सीबीएसई'ने जारी केले असून, नव्या नियमांनुसास ८ जुलै २०१८ रोजी परीक्षा होणार आहे.  याबाबतची अधिकृत घोषणा http://cbsenet.nic.in या वेबसाईटवर एक फेब्रुवारीला होणार आहे. असे असेल परीक्षेचे स्‍वरुप नेट परीक्षेत सीबीएसईकडून काही मूलभूत बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार परीक्षा आता ३५० ऐवजी ३०० गुणांची असणार आहे. तसेच पूर्वी असणार्‍या तीन पेपर ऐवजी आता दोनच पेपर असणार असून पहिला पेपर ५० प्रश्‍न व दुसरा पेपर १०० प्रश्‍न प्रत्येकी २ गुण, असे एकूण ३०० गुणांची परीक्षा होणार आहे. तसेच परीक्षेच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे. १०० गुणांच्या (५० प्रश्‍न) पहिल्या पेपरसाठी १ तासाचा अवधी असणार आहे. तर, दुसर्‍या २०० गुणांच्या (१०० प्रश्‍न) पेपरसाठी दोनच तास वेळ असणार आहे. परीक्षेचे बदललेले स्‍वरूप पेपर पहिला एकूण प्रश्‍न : ५०गुण : १००, वेळ सकाळी ९.३० ते १०.३० (१ तास) अभ्यासक्रम पूर्वीच्या पहिल्या पेपरनुसारच असणार आहे. तसेच सर्व विषयांसाठी पहिला पेपर एकच असणार असून सर्व प्रश्‍न अनिवार्य असणार आहेत. दुसरा पेपर एकूण प्रश्‍न : १००, गुण : २००, वेळ सकाळी ११ ते दुपारी १ पर्यंत ( २ तास) अभ्यासक्रम निवडलेल्या विषयानुरुप असणार असून सर्व प्रश्‍न अनिवार्य असणार आहेत. 'जेआरएफ'साठी वयाच्या अटीत २ वर्षांनी वाढ ज्युनिअर रिसर्च फेलोशिपसाठीच्या वयाच्या अटीत बदललेल्या नियमांनुसार दोन वर्षांची वाढ करण्यात आली आहे. पूर्वीच्या खुल्या गटासाठी पूर्वीच्या २८ वर्षांवरून आता वयाची अट ३० वर्षे करण्यात आली आहे. मागास प्रवर्गांसाठी यामध्ये ५ वर्षे अधिक असणार आहेत. असा असेल ८ जुलैच्या परीक्षेचे कार्यक्रम सीबीएसईच्या नव्या नियमानुसार युजीसी नेट परीक्षा ८ जुलै २०१८ रोजी होणार आहे.

१. ऑनलाईन फॉर्म भरणे : ६ मार्च २०१८
२. फॉर्म भरण्याची अंतिम मुदत : ५ एप्रिल २०१८
३. चलन करण्याची अंतिम मुदत : ६ एप्रिल २०१८
४. युजीसी नेट परीक्षा : ८ जुलै २०१

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात ९८ जणांची सुरक्षा रक्षक पदासाठी निवड

राणीसावरगाव (प्रतिनिधी) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, विद्यार्थी विकास समिती आणि एस. एस. सिक्यु...