पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यल्यात प्रजास्तकदिनी आनंदनगरी भरविण्यात आली. यामध्ये विविध पदार्थाचे चाळीस स्टॉल उभारण्यात आले आहे. यात वीस हजाराची उलाढाल झाली.
दरवर्षीप्रमाणे यंदाही आनंदनगरीचे आयोजन करण्यात आले आहे. प्राचार्य डॉ. शिवाजी दळणर, संस्थेचे अध्यक्ष अॅड. रंगनाथ राठोड, उपप्राचार्य उत्तम देवकते यांच्या हस्ते आनंदनगरीचे उदघाटन करण्यात आले. या नगरीमध्ये मोदी टी स्टाँल , ग्रामीण मेवा, मठ्ठा,मोहळचा मद विध्यार्थ्यांने तयार केलेले गरम पोहे,
मेंदू वडा हे आकर्षण ठरले. यामध्ये विध्यार्थी-विध्यार्थिनी मोठया प्रमाणात समावेश होता. विध्यार्थ्यांना आपले उद्योग सुरु करता यावेत या उदेशाने आनंदनगरीचे आयोजन करण्यात येते अशी प्रतिक्रिया प्राचार्य डॉ. शिवाजी दळणर यांनी दिली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. बालाजी गव्हाळे,प्रा.ज्ञानेश्वर खोमणे, प्रा.लोमटे यांनी सहकार्य केले.
