Thursday, January 22, 2026

माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात जुन्या आठवणींना उजाळा

 

परभणी  (प्रतिनिधी ):  लहानपणी नकोशी वाटणारी शाळा नंतर मात्र हवीहवीशी वाटते. शाळेंची गोष्ट काही औरच असते.  याचा प्रत्यय रविवारी पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर विद्यालयात झालेल्या माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात आला आहे. जवळपास 18 वर्षानंतर एकत्र आलेल्या शाळेतील मित्रांनी गमती जमती, शिक्षकांनी केलेली शिक्षा अशा अनेक आठवणींना उजाळा दिला आहे. 

गंगाखेड तालुक्यातील राणीसावरगाव येथील पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर विद्यालयातील इयत्ता दहावीची 2006-2007 या बॅचमधील विद्यार्थ्यांनी दि.18 जानेवारी 2026 वार रविवारी माझी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात अध्यक्ष म्हणून संस्थेचे सचिव कृष्णा भैया शिवाजीराव दळणर तर व्यासपीठावर मुख्याध्यापक लक्ष्मण पोले, शिक्षक विनायक दालपे, एस. जी. साळवे, घोरपडे,ए.पी.जोशी, आर. ए. जोशी आदींची उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, संस्थापक प्राचार्य शिवाजीराव दळणर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. माजी विद्यार्थ्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची प्रतिमा भेट स्वरूपात दिली. तसेच इयत्ता दहावी मधून प्रथम, द्वितीय, तृतीय येणाऱ्यास बक्षीसही ठेवले आहे.  विविध क्षेत्रात कार्यरत असलेले विद्यार्थी, विद्यार्थिनी यावेळी एकत्र आले होते. धावपळीच्या आयुष्यात प्रत्येक जण आप आपल्या कामात गुंतलेला आहे. पण शाळेची आठवण कायम येत असल्याचे प्रत्येकांच्या भाषणातून व्यक्त होत होते. माझी विद्यार्थी बंडू पोळ, संदीप माने, रामचंद्र माने, कृतिका कासंडे आदी विद्यार्थ्यांनी शिवाजी दळणर सरांच्या भाषणामुळे एक नवी ऊर्जा आम्हाला मिळाली.18 वर्षानंतर विद्यालयात आलो.  मित्रांना भेटण्याचा आनंद अत्यंत दुर्मिळ आहे. विद्यालयात असताना केलेल्या मोजमजेच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. आजचा दिवस महत्त्वाचा असल्याचा सूर या भाषणातून निघाला आहे. या मेळाव्यात विद्यार्थ्यांबरोबर शिक्षकांनाही सहभाग घेताला असल्याने चांगलीच धमाल उडाली. अनेक विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत संगीत, विनोद, डायलॉग अनेक प्रसंग ताज्या करून दाखविल्या. शिक्षकांनी काढलेली खोड याचीही आठवण करून दिली. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक शिक्षक टी.बी. देवकते यांनी केले तर सूत्रसंचालन ज्ञानेश्वर राठोड तर आभार तृप्तीका कासंडे यांनी मानले. या कार्यक्रमाला माजी विद्यार्थी, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

No comments:

Post a Comment

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात ९८ जणांची सुरक्षा रक्षक पदासाठी निवड

राणीसावरगाव (प्रतिनिधी) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, विद्यार्थी विकास समिती आणि एस. एस. सिक्यु...