राणीसावरगाव (प्रतिनिधी): आजचा भारत
हा तरुणांचा आहे. देशाचं भविष्य आपल्या हातात आहे. केवळ अधिकार मागणारे नव्हे तर
कर्तव्यदक्ष नागरिक बनविणे हेच खरी देशभक्ती असल्याचे प्रतिपादन प्राचार्य
रेणुकादास बोनर यांनी केले आहे.
पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा
करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सचिव कृष्णाभैया दळणर यांची
उपस्थिती होती तर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक पोले, संस्थेचे
संचालक दिगंबर हाके, ॲड. राठोड, संस्थेच्या
अध्यक्षा मधुमाला दळणर, प्राचार्य रेणुकादास बोनर, संचालिका शिवानी दळणर, संगीता होनमने, डॉ. डुमनर, शिक्षक शेख आदींची उपस्थिती होती.
मान्यवरांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, महात्मा
गांधी, डॉ.बाबसाहेब आंबेडकर, संस्थेचे
अध्यक्ष शिवाजी दळणर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले आहे. त्यानंतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर कॉपीमुक्त अभियान, जागृत मतदान इत्यादी विषयी शपथ
घेतली. संगीत विभागाने स्वागत गीत सादर केले. त्याचबरोबर गुणवंत विद्यार्थ्यांचा
सत्कार, मुलींना मोफत सायकलीचे वाटप करण्यात आले आहे. यावेळी
बोनर म्हणाले,“ प्रजासत्ताक दिन हा देशासाठी अत्यंत
अभिमानाचा आणि ऐतिहासिक आहे. या दिवशी संविधान अमलात आणले आहे. संविधानामुळे
प्रत्येक भारतीयांना स्वातंत्र्य समता आणि बंधुत्व मिळाले. सविधान हे केवल
कायद्याचं पुस्तक नाही तर लोकशाहीची ओळख आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला
मजबूत पाया संविधानामुळे दिला आहे. देशाची स्थिती, अर्थव्यवस्था
या विषयावर त्यांनी सखोल असे मार्गदर्शन केले. यावेळी संस्थेचे सचिव कृष्णा भैया
म्हणाले,“ देशाच्या प्रगतीसाठी प्रमाणिकपणे काम करणे आवश्यक
आहे. विद्यार्थ्यांनी विविध कार्यक्रमात सहभागी होऊन होळकर संस्थेचे नाव मोठे केले
आहे. येथील विद्यार्थी हा घडला पाहिजे, असे सांगून
प्रजासत्ताकांच्या सर्व पालक आणि विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. या
कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ. दुलेखान पठाण यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन
डॉ. विजयकुमार सोनर यांनी केले. या कार्यक्रमाचे आभार शिक्षक चव्हाण यांनी मानले.
या कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक, शिक्षक
मोठ्या संख्येने उपस्थित होते.


No comments:
Post a Comment