Tuesday, March 24, 2026

होळकर महाविद्यालयात महिला दिन साजरा

 राणीसावरगाव (प्रतिनिधी):  पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात  महिला विकास समितीच्या महिला दिनाचे औचित्य साधून मराठवाड्यातील स्त्रियांचे डिजिटल आर्थिक व स्वास्थ्य सक्षमीकरण 2026 या विषयी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. 

या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभारी प्राचार्य विजयकुमार सोन्नर  हे उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. कौशल्य शिंदे, महिला विकास समितीच्या अध्यक्षा प्रा. डॉ. सारिका केदार, समितीच्या सदस्य प्रा. डॉ. कल्पना तायवाडे, प्रा. लक्ष्मी गुहाडे  यांची उपस्थिती होती. या यावेळी  प्रा. सोन्नरडॉ. कौशल्या शिंदे यांचा  सत्कार करण्यात आला.  तसेच या कार्यक्रमाचे औचित्य साधून महाविद्यालयातील प्राध्यापिका यांचे स्वागत करण्यात आले. प्रा. डॉ सारिका केदार  यांचे स्वागत प्रा. लक्ष्मी गुहाडे  यांनी केले. प्रा. डॉ. दिपाली पांडे  यांचे स्वागत कल्याणी टाकळकर या विद्यार्थिनींनी केले. प्रा. डॉ. कल्पना तायवाडे  यांचे स्वागत यशश्री मोटे या विद्यार्थिनींनी केले. लक्ष्मी गुहाडे, स्वागत अंकिता मोरे या विद्यार्थ्यांनी केले.


 प्रा. मनीषा दुबे  वाणिज्य शाखा प्रतीक्षा मोरे या विद्यार्थ्यांनी केले. तसेच महाविद्यालयाचे विद्यार्थिनी प्रतिनिधी म्हणून दिव्या टोकलवाड या विद्यार्थिनींची निवड झालेले असून तिचे स्वागत पूनम इमडे या विद्यार्थिनीने केले. तसेच प्रमुख पाहुणे यांनी अत्यंत मोलाचे मार्गदर्शन डॉ. कौशल्या शिंदे  यांनी मुलींना केले. त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनातून मुलींना  सांगितले की, मुलींसाठी त्यांचा आहार किती महत्वाचा आहे.  त्यांनी मासिक पाळी मध्ये काय खावे, तसेच योगा किती महत्वाचा आहे, प्रथिने किती महत्त्वाचे आहेत, ते कशातून मिळतात व आपल्या घरीजे आहे. त्यातून आपण काय मिळवू शकतो. आपले स्वास्थ्य किती महत्त्वाचे आहे. त्याची काळजी कशी घ्यावी. इ. मार्गदर्शन केले.  या कार्यक्रमाचे सांगता अध्यक्षांच्या अध्यक्षिय समारोपातून झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला विकास समितीच्या अध्यक्षा प्रा. सारिका केदार  यांनी केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन पूनम इमडे या विद्यार्थिनींनी केले.

 

 

No comments:

Post a Comment

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात ९८ जणांची सुरक्षा रक्षक पदासाठी निवड

राणीसावरगाव (प्रतिनिधी) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, विद्यार्थी विकास समिती आणि एस. एस. सिक्यु...