राणीसावरगाव (प्रतिनिधी):
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील भूगोल विभाग, पाली विभाग, तत्वज्ञान विभाग, गृहविज्ञान
विभागाच्या वतीने भूगोल दिन व मकर संक्रात उत्सव साजरा करण्यात आला आहे.
या
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. रेणुकादास बोनर यांची उपस्थिती होती. तर
प्रमुख पाहुणे म्हणून प्रा अंकुश गायके, प्रा. अभय
पाटील, डॉ शंकर घाडगे, डॉ बालाजी
गव्हाळे, डॉ. सारिका केदार, डॉ. कल्पना
तायवाडे, प्रा. लक्ष्मी गुहाडे आदींची उपस्थिती होती. यावेळी
भूगोल विभागाच्या वतीने भितीपत्रकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी मान्यवरांची
भाषने झाली. तसेच विद्यार्थी रोशन घाडगे यांनी आपले विचार मांडले या कार्यक्रमाचे
सूत्रसंचालन कृष्णा राठोड यांनी केले तर आभार विद्यार्थिनी स्नेहा स्वामी हिने
मानले या कार्यक्रमाला विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


No comments:
Post a Comment