राणीसावरगाव
(प्रतिनिधी): मराठी भाषेचे भवितव्य तसे उज्वलच आहे, मराठी भाषा ही मुळात समृद्ध भाषा आहे. परंतु अजूनतिला ज्ञानभाषा म्हणून समृद्ध करायचे असेल तर इतर भाषेतील ज्ञान आणि साहित्य मराठी
भाषेत आणले पाहिजे. त्यासाठी मराठी लेखकांनी इतर भाषेतील साहित्य मराठी भाषेत
अनुवादित करावे. आणि मराठी भाषेला समृद्ध करावे.असे मत
प्रा.पाटील यांनी व्यक्त केले.ते 'मराठी भाषेचे भवितव्य'
या विषयावर मराठी विभागाच्यावतीने
आयोजित करण्यात आलेल्या मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त बोलत होते.

प्रा.प्रकाश चौधरी
यांनी संत साहित्याची अनेक उदाहरणे देत संतानी मराठी भाषा कशी घडवली आणि मराठी
भाषेची कशी जडणघडण होत गेली हे सांगितले.तर तृतीय वर्षाचा विद्यार्थी रोषण घाटगे, यांनी कविता सादर केली. या
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.रेणुकादास बोन्नर तर प्रमुख पाहुणे
म्हणून प्रा. अभय पाटील, प्रा.प्रकाश चौधरी मराठी विभाग
प्रमुख प्रा. डॉ संतोष हंकारे, प्रा. डॉ.श्रीहरी चव्हाण हे
उपस्थित होते. रोषण घाटगे, यांनी कविता सादर केली. कार्यक्रमाचे प्रस्ताविक
प्रा. डॉ.संतोष हंकारे यांनी केले तर सूत्रसंचालन कु.मनिषा टोकलवाड या
विद्यार्थ्यांनी केले आभार प्रा. डॉ.श्रीहरी चव्हाण यांनी मानले. कार्यक्रमाला विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:
Post a Comment