राणीसावरगाव - प्रत्येक माणसाला जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर वाचन हे मानवी जीवनाचा एक अविभाज्य भाग बनले पाहिजे म्हणून केवळ विद्यार्थ्यांनीच नाही तर प्रत्येक माणसाने एक छंद म्हणून फक्त वाचनाचा आनंद घेऊ नये तर जीवनाची साधना समजून आपण वाचन केले तर निश्चितच आपल्या जीवनात बदल घडून आल्याशिवाय राहत नाही . त्यामुळे वाचन हा छंद नाही तर जीवनाची साधना आहे. असे मत कृष्णाभैय्या शिवाजीराव दळणर यांनी केले. ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात मराठी विभाग व सैनिकशास्त्र विभागाच्यावतीने डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या वाचन प्रेरणा दिन कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करतांना बोलत होते. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.तुकाराम बोबडे हे उपस्थित होते.ते बोलतांना असे म्हणाले की. वाचन आनंदासाठी, व्यक्तिमत्व विकसित करण्यासाठी आणि आपल्यातील क्षमता विकसित करण्यासाठी महत्त्वाचे काम करते. अग्निपंख -डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या आत्मचरित्रातुन प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात उभे राहण्यासाठी प्रेरणा मिळते असे ते म्हणाले. या प्रसंगी प्रमुख उपस्थिती प्राचार्य डॉ रेणुकादास बोन्नर, मराठी विभाग प्रमुख डॉ संतोष हंकारे, सैनिकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ.आनंद घन हे उपस्थित होते. या कर्यक्रमात डॉ एपीजे अब्दुल कलाम यांच्या ‘अग्निपंख ‘ या ग्रंथाचे अभिवाचन करण्यात आले. या ग्रंथ अभिवाचन उपक्रमात विद्यार्थ्यांनी व प्राध्यापकांनी सक्रिय सहभाग घेतला आणि अग्निपंख ग्रंथाचे अनेकांनी अभिवाचन केले. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ संतोष हंकारे यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा डॉ.शंकर घाडगे यांनी केले आभार डॉ श्रीहरी चव्हाण यांनी केले.




