Tuesday, March 24, 2026

होळकर महाविद्यालयत विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी व्याख्यान संपन्न

राणीसावरगाव (प्रतिनिधी): पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालय, राणीसावरगाव येथील गृहविज्ञान विभागाच्या वतीने आयोजित व्याख्यान विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त व प्रेरणादायी ठरले. या कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक व कौशल्याधारित शिक्षणाचे महत्त्व समजावून देणे हा होता.

प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित असलेल्या प्रा. रेखा देशमुख (गृहविज्ञान विभाग, कै. बापूसाहेब पाटील एकंबेकर महाविद्यालय, उदगीर) यांचे स्वागत गृहविज्ञान विभाग प्रमुख प्रा. लक्ष्मी गुहाडे यांनी केले, तर विद्यार्थिनी गायत्री पाटील हिने पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य रेनुकादास बोनर होते, तर प्रा. बालाजी गव्हाळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. व्याख्यानामध्ये प्रा. रेखा देशमुख यांनी गृहविज्ञानातील प्रात्यक्षिक व कौशल्यांचे महत्त्व स्पष्ट करताना विद्यार्थ्यांना केवळ सैद्धांतिक ज्ञान पुरेसे नसून प्रत्यक्ष काम करण्याची क्षमता विकसित करणे आवश्यक असल्याचे सांगितले. त्यांनी शिवणकाम, अन्न प्रक्रिया, मानव विकास, घर व्यवस्थापन आणि विस्तार शिक्षण या विषयांचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच कौशल्याधारित शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना भविष्यात रोजगाराच्या विविध संधी कशा उपलब्ध होऊ शकतात, याबाबत मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृष्णा राठोड यांनी केले, तर शेवटी रोशन घाटके यांनी उपस्थितांचे आभार मानले. संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन गृहविज्ञान विभागाच्या वतीने करण्यात आले.



No comments:

Post a Comment

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात ९८ जणांची सुरक्षा रक्षक पदासाठी निवड

राणीसावरगाव (प्रतिनिधी) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, विद्यार्थी विकास समिती आणि एस. एस. सिक्यु...