Monday, January 29, 2018

होळकर महाविद्यालयात रंगला क्रिकेटचा सामना

राणीसावरगाव (समाधान जाधव)

  
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचे उदघाटन प्राचार्य डॉ. शिवाजी दळणर, अँड. रंगनाथ राठोड,  डॉ. उत्तम देवकत्ते,  डॉ. विठ्ठल डुमनर यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेमध्ये पाच संघाचा समावेश होता. यामध्ये अकरावी व बारावी, प्रथम वर्षे, द्वितीय वर्ष, आणि तृतीय वर्ष यांचा समावेश होता. पहिली
स्पर्धा प्रथम- द्वितीय वर्षाची घेण्यात आली. यातुन विजयी झालेल्या
संघाशी म्हनजेच द्वितीय वर्षाच्या  सामन्याशी झाली  आणि प्रथम वर्ष संघाचा कर्णधार विलास हाके यांनी विजय पटकावला. कर्णधार अंकुश चव्हाण, समाधान हाके, शरद चव्हाण, सुधीर उबाळे यांना पराभव पत्करावा लागला. या स्पर्धेतील पंच म्हणून प्रा. दुल्हेखाँन पठाण, प्रा. विजयकुमार सोन्नर, प्रा.सुर्यकांत फुटके, प्रा.अगंद गडमे यांनी काम पहिले.


पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात ९८ जणांची सुरक्षा रक्षक पदासाठी निवड

राणीसावरगाव (प्रतिनिधी) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, विद्यार्थी विकास समिती आणि एस. एस. सिक्यु...