Monday, January 29, 2018

विद्यार्थांनी महापुरुषांच्या चरित्र्याचा अभ्यास करावा

राणीसावरगाव: (मंगेश भालेराव)

 
 देशातील महापुरुषांचा इतिहास जाणुन घेऊन अभ्यास केला तर जीवनामध्ये कोणतेहि अपयश येणार नाही, म्हणजेच त्याला यशप्राप्ती होईल, असे प्रतिपादन बहि:शालचे वक्ते प्रा. गोविंद शेळके यांनी केले.

          स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ व  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालय राणीसावरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने बहि:शाल शिक्षण केंदांतर्गत इसाद इथे  “महापुरुषाचे चरित्र आणि कार्य” या विषयावर ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भीमराव भोसले हे होते, तर प्रमुख वक्ते म्हणून प्रा. गोविंद शेळके, उपप्राचार्य डॉ. उत्तम देवकत्ते, प्रा. गोविंद शिळे, बालासाहेब भोसले यांची उपस्थिती होती. शेळके म्हणाले, "देशातील महान पुरुषांचा इतिहास मोलाचा आहे. त्यांच्या च
रित्राचा अभ्यास आजच्या युवकांनी केला पाहिजे. जो विध्यार्थी महापुरुषांचे चरित्र वाचतो. तो स्पर्धा परीक्षेत नापास होत नाही" असे त्यांनी सांगितले . या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ. संतोष हंकारे यांनी केले. तर आभार प्रा. अंगद गडमे यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विजयकुमार सोन्नर, डॉ. बालाजी शिंदे , गोवर्धन जोगदंड, यमगर गिरी, मंगेश भालेराव यांनी प्रयत्न केले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात ९८ जणांची सुरक्षा रक्षक पदासाठी निवड

राणीसावरगाव (प्रतिनिधी) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, विद्यार्थी विकास समिती आणि एस. एस. सिक्यु...