राणीसावरगाव (प्रतिनिधी):
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड सलग्नित पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर
महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने. मौजे इळेगाव येथे वार्षिक विशेष शिबिर 3 डिसेंबर ते 9
डिसेंबर 2025 या कालावधीत "शाश्वत
विकासासाठी युवक: जलसंधारण व्यवस्थापन आणि ओसाड भूमी विकासावर विशेष भर" या
विषयावर आयोजित करण्यात आले आहे
वार्षिक विशेष शिबिराचे उद्घाटन 3 डिसेंबर
2025 रोजी सकाळी 11:00 वाजता आयोजित
करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रेणुकादास
बोनर यांची उपस्थिती राहणार आहे तर उद्घाटक म्हणून संस्थेचे सचिव कृष्णाभैया
शिवाजीराव दळणर, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे
सिनेट सदस्य ईंजी. नारायण चौधरी यांची उपस्थिती राहणार
आहे. तर प्रमुख उपस्थिती म्हणून ईळेगाव येथील सरपंच सौ. प्रभावती मारोतराव काळे,
उपसरपंच सौ. गोदावरी मारोतराव धापसे,
मुख्याध्यापक आर.डी. आचार्य, ग्राम विकास
अधिकारी प्रकाश दुधाटे, डॉ. प्रकाश सुर्वे यांची उपस्थिती
राहणार आहे.
4 डिसेंबर
2025 रोजी बौद्धिक सत्रामध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिर,
मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तर सांस्कृतिक
कार्यक्रमात व्यसनमुक्ती पाणी व्यवस्थापन आणि समाज
प्रबोधनावरती शाहीर भारत मुंजे यांचा कार्यक्रम होणार
आहे.
5 डिसेंबर
2025 रोजी शुक्रवारी बौद्धिक सकाळ सत्रामध्ये मोफत पशु तपासणी शिबिर, मोफत जंतनाशक तपासणी शिबिर
सकाळी 10 ते 4 या दरम्यान घेण्यात
येणार आहे. हे शिबिर डॉ. रवींद्र पाईकराव यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. या
शिबिरामध्ये जनावरांची विविध तपासणी आणि औषधी देण्यात येणार आहेत. सायंकाळच्या सत्रामध्ये 7 वाजता कृषी तज्ञ, हवामान तज्ञ डॉ. पंजाबराव डक यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. तर गीत
सुमनांजली हाही कार्यक्रम घेण्यात येणार आहे. 6 डिसेंबर 2025 शनिवार रोजी बौद्धिक सकाळच्या सत्रात पडीक
जमिनीचा वापर व माती परीक्षण करण्यात येणार आहे. सायंकाळच्या सत्रामध्ये
वैज्ञानिक दृष्टिकोन आणि चमत्कार सादरीकरण या विषयावर उत्तेरेश्वर बिराजदार आणि
सुधीर भोसले यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. 7 डिसेंबर
2025 रविवार रोजी सकाळच्या सत्रात गाव व स्मशानभूमी, स्वच्छता अभियान राबविण्यात
येणार आहे तर सायंकाळच्या सत्रामध्ये आजच्या आधुनिक शिक्षणातील
युवकासमोरील आव्हाने या विषयावर प्रा. महादेव सुरनर तर पालक नको मालक बणा या
विषयावर डॉ. तुकाराम बोबडे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. 8 डिसेंबर
2025 सोमवार रोजी सकाळच्या सत्रात पाणी व्यवस्थापन काळाची
गरज या विषयावर डॉ. कालिदास गुडदे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. तसेच वृक्षारोपण
कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तर सायंकाळच्या सत्रामध्ये महिला सबलीकरण आणि बाल हक्क संरक्षण या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात
आले आहे. यावेळी महिला व बालविकास अधिकारी श्रीमती मोनिका रंधवे, जिल्हा बाल संरक्षण कक्ष अधिकारी श्रीमती आम्रपाली पाचपुंजे, जिल्हा समन्वयक संदीप बेडसुरे, केंद्र प्रशासक
तेजस्विनी कांबळे यांची उपस्थिती राहणार आहे.या कार्यक्रमाचा समारोप
सोहळा 9 डिसेंबर
2025 मंगळवार रोजी सकाळी 11:00 वाजता
होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य रेणुकादास बोनर
यांची उपस्थिती लाभणार आहे. तर प्रमुख मार्गदर्शक संस्थेचे सचिव कृष्णा भैया
शिवाजीराव दळणर तर प्रमुख उपस्थिती उपविभागीय अधिकारी
जीवराज डापकर, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र
शिरतोडे, सरपंच प्रभावती मारोतराव काळे यांचे उपस्थिती
लाभणार आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक तसेच ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आव्हान कार्यक्रम अधिकारी
डॉ. बालाजी
शिंदे आणि डॉ. अंगद गडमे यांनी केले आहे.

No comments:
Post a Comment