परभणी (प्रतिनिधी): हवामान म्हणजे एखाद्या विशिष्ट वेळी, विशिष्ट ठिकाणी वातावरणाची तत्कालीन परिस्थिती असते, ज्यात तापमान, दाब, आद्रता, वारा आणि पाऊस यांचा समावेश असतो. वाऱ्यांची गती आणि दिशांनी हवामानांचा अंदाज काढता येतो, असे प्रतिपादन हवामान तज्ञ पंजाब डक यांनी केले आहे.
पुण्यश्लोक
अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने मोजे इळेगाव
येथे विशेष वार्षिक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी
ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कार्यक्रम अधिकारी डॉ. बालाजी शिंदे
यांची उपस्थिती होती तर व्यासपीठावर डॉ. अंगद गडमे यांची उपस्थिती होती. यावेळी
पंजाब डख यांचा सत्कार डॉ. बालाजी शिंदे यांनी केला. यावेळी पंजाब डक म्हणाले,“पुढील 50 वर्षाचा पाऊस,थंडी,
ऊन, पिकांची परिस्थिती विषयी माहिती सांगितली.
कापूस लागवड, तुरीवरील उपाय योजना, उसाची
लागवड, हळदीवरील उपाय, सोयाबीन अधिक
पिकांची माहिती सांगून हवेतील उष्णता आणि थंडीचे
प्रमाण कसे ओळखले जाते. यांची माहिती सविस्तर सांगितली आहे. त्याचबरोबर हवामान बदल
झाला की पुढील निसर्गांची चक्री बदलत असतात. हवेच्या वजनामुळे पडणारा पाऊस जो ढगाळ
आणि पावसावर परिणाम करीत असतो. गारा या पांढऱ्या जमिनीवरच पडत असतात. हवामानाचा
अंदाज घेण्यासाठी तंत्राचा उपयोग करीत नाही, तर निसर्गाचा
उपयोग करून हवामान सांगतो, असेही त्यांनी सांगितले. यावेळी
डॉ. शिंदे यांनी हवामान तज्ञ पंजाब डख यांच्या समोरील हवामान खातं फीक पडत आहे.
कोणतेही तंत्र त्यांच्याजवळ नसताना हवामान आणि पाऊस सांगणे म्हणजे निसर्गाच्या
सखोल अभ्यासच करावा लागतो. निसर्गांचा सखोल अभ्यास त्यांनी केलेला आहे,
असे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ. अंगद गडमे
यांनी केले तर सूत्रसंचलन विद्यार्थी रोशन घाडगे यांनी केले तर आभार कृष्णा राठोड
यांनी मानले. या कार्यक्रमाला विद्यार्थी, ग्रामस्थ
मोठ्या संख्येने उपस्थित होते.


No comments:
Post a Comment