Monday, December 15, 2025

मोफत तपासणी शिबिरात 300 पशुनी घेतला लाभ

राणीसावरगाव (प्रतिनिधी):  पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे मोजे इळेगाव  येथे विशेष वार्षिक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये परिसरातील शेतकऱ्यांनी तीनशे विविध जनावराची मोफत तपासणी आणि मोफत औषधीचे वाटप करण्यात आले आहे. 

राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत मोफत पशु तपासणी आणि मोफत जंतनाशक शिबिरात गोचीड तपासणी, खुरी तपासणी, लस तपासणीगर्भ तपासणी, दुग्ध वाढीसाठी तपासणी, गोमाशी औषधी, जंतनाशक औषधी, गाई आणि म्हशी तपासणी, खच्चीकरण तपासणी करण्यात आली आहे. यामधे बैल, गाई, म्हैस, शेळ्या, पाळीव कुत्रे, वासरं आदि जनावरांची तपासणी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रवींद्र पाईकराव यांच्या टीमने केली आहे. सकाळी 8:00 पासून दुपारी 2:00 वाजे दरम्यान विविध  जनावरांच्या तपासणीसाठी झुंबड पडली होती. जनावरांच्या विविध आजारावर उपचार केला. परिसरातील शेतकऱ्यांनी आपल्या जवळील जनावरांची मोफत तपासणी करून घेतली. या वेळी कार्यक्रम अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, डॉ. अंगद गडमे, डॉ. कपिल लामतुरे, प्रा. विजयकुमार पवळे, रोशन घाडगे आदींनी काम पहिले. या शिबिरासाठी सामाजिक कार्यकर्ते मारोतराव काळे, मारोतराव धापसे आदींनी सहकार्य केले आहे.


No comments:

Post a Comment

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात ९८ जणांची सुरक्षा रक्षक पदासाठी निवड

राणीसावरगाव (प्रतिनिधी) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, विद्यार्थी विकास समिती आणि एस. एस. सिक्यु...