Wednesday, April 3, 2024

कर्तृत्वातूनच देशाचे नेतृत्व विकसित होत असते - डॉ. दिलीप टिपरसे

राणीसावरगाव (प्रतिनिधी):-  विद्यार्थ्यांनी ज्ञानर्जन करण्याबरोबर आपल्यामध्ये सुप्त स्वरूपात असलेल्या गुणांचा विकास करून आपले कर्तुत्व सिद्ध केले पाहिजे, कारण कर्तृत्वातूनच देशाचे नेतृत्व विकसित होत असते, असे  प्रतिपादन उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे यांनी केले.

स्वामी रामानंद तीर्थ मराठा विद्यापीठ नांदेड व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने पाच दिवसीय परभणी- हिंगोली जिल्हास्तरीय युवक- युवती नेतृत्व विकास प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. कांतराव पोले उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक पठाण, केंद्रीय सदस्य डॉ. प्रकाश सुर्वे,  डॉ. विठ्ठल डूमनर, डॉ. विश्वनाथ रासवे, डॉ. बालाजी शिंदे यांची उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते महात्मा गांधी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, संस्थापक अध्यक्ष प्राचार्य डॉ. शिवाजी दळणर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर दीपप्रज्वलाने कार्यक्रमांची सुरुवात झाली. मान्यवरांचे स्वागत संगीत विभागाने स्वागत गीतांनी केले. यावेळी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी  डॉ. टिपरसे म्हणाले,” ध्येय निश्चित केल्यास यश मिळू शकते, कोणत्याही क्षेत्रात काम करताना अगदी मनापासून काम अंगीकारले पाहिजे, जोपर्यंत आपल्याला समाधान मिळत नाही तोपर्यंत आपले कार्य केले पाहिजे. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी वाचन संस्कृती आवश्यक आहे. जो विद्यार्थी या संस्कृतीला अंगीकारल तो चांगला अधिकारी होऊ शकतो. त्यासाठी नियमित अभ्यास करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय सेवा योजनेची जोड असल्यास स्टेज करिअर आणि समाजसेवा ही प्रति तयार होते. सर्वांनी राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये सहभागी होऊन काम केले पाहिजे, असेही आव्हान त्यांनी केले आहे.

  यावेळी अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य पोले म्हणाले,”विद्यार्थ्यांना दृष्टीतून दिशा मिळते. आजच्या विद्यार्थ्यांमध्ये दृष्टी आणि दिशेचा मोठा अभाव जाणवतो म्हणून विद्यार्थ्यांनी योग्य दिशेने मार्गक्रमण केल्यास हवं त्या क्षेत्रात यश मिळतं.  यश मिळविण्यासाठी सृष्टी आणि दृष्टी असायला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन इंग्रजी विभागाचे विभाग प्रमुख डॉ. तुकाराम बोबडे यांनी केले तर प्रस्ताविक डॉ. विश्वनाथ रासवे यांनी केले. या कार्यक्रमाचे आभार डॉ. बालाजी शिंदे यांनी मानले. या कार्यक्रमाला युवक- युवती आणि कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



No comments:

Post a Comment

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात ९८ जणांची सुरक्षा रक्षक पदासाठी निवड

राणीसावरगाव (प्रतिनिधी) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, विद्यार्थी विकास समिती आणि एस. एस. सिक्यु...