परभणी (प्रतिनिधी) दि.(२७) माणसांच्या स्वभाविक जगण्यातून कोणतीही भाषा सहजपणे रूजते, वाढते आणि विकसित होते.मराठी भाषा ही आपल्या स्वभाविक जगण्यातून विकसित झालेली भाषा आहे.म्हणून बोली भाषा जोपासल्याशिवाय आणि माणसांचे अनुभवविश्व समजून घेतल्याशिवाय मराठी भाषेचा विकास होणार नाही.असे मत डॉ.तुकाराम बोबडे यांनी व्यक्त केले.ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात मराठी विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या कविश्रेष्ठ कुसुमाग्रज जयंतीनिमित्त मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमात बोलत होते.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ रेणुकदास बोन्नर हे उपस्थित होते.अध्यक्षीय समारोप करताना ते असे म्हणाले की, कोणतीही भाषा त्या भाषेत नवनिर्मीती केल्याशिवाय ज्ञान भाषा होऊ शकत नाही आणि जग ते स्विकारू शकत नाही. म्हणून मराठी भाषेत नवनिर्मीती करणारांनी ज्ञान, विज्ञान, आणि तंत्रज्ञानाचा उपयोग करून घेऊन नवनिर्मिती केली पाहिजे. त्याशिवाय मराठी भाषा विकसित होणार नाही.असे ते म्हणाले.कार्यक्रमाचे प्रस्ताविक मराठी विभाग प्रमुख प्रोफेसर डॉ संतोष हंकारे यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा. डॉ.बालाजी शिंदे यांनी केले तर आभार डॉ श्रीहरी चव्हाण यांनी मानले.
या कार्यक्रमाला विद्यार्थी व प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कृष्णा राठोड, रोशन घाटके,गिरीधर यमगर यांनी परीश्रम घेतले.
.jpg)
.jpg)
No comments:
Post a Comment