Saturday, August 19, 2017

मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्तीचा प्रश्‍न न सुटल्यास आंदोलन करणार



केंद्र व राज्यसरकारने मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती मंजूर  केली मात्र जिल्हयामध्ये सर्वर डाउन असल्यामुळे शिष्यवृत्तीचा अर्ज  स्वीकारला जात नाही.त्यामुळे यंदा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळेल का असा प्रश्‍न विद्यार्थी व पालकामध्ये पडलेला आहे.गत वर्षाची शिष्यवृत्ती अजूनही मिळाली नाही त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले या वर तोडगा न निघाल्यास विद्यार्थी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.
        गेल्या काही दिवसापासून समाजकल्याण विभागातर्फे ई - शिष्यवृत्तीची वेबसाइट ओपन होत नाही.त्यामुळे विद्यार्थ्यांनी  शिष्यवृत्तीचे अर्ज कुठे करायचा या विचारामध्ये पडले आहेत.काही विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती विभागास संपर्क साधला,संपर्क साधला असताना ते म्हणाले आपला शिष्यवृत्तीचा अर्ज ऑनलाईनच भरूनच महाविद्यालयामध्ये जमा करावा.या संदर्भातमध्ये समाजकल्याण अधिकार्‍यांनी जातीनं लक्ष घालून विद्यार्थ्यांनाचा प्रश्‍न लवकरच सोडवावा अन्यथा मागासवर्गीय विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन सादर करतील.त्यानंतरही प्रश्‍न सुटला नाही तर आंदोलन प्रत्येक समाजविभाग कार्यालयासमोर करणार आहेत.गत वर्षाची शिष्यवृत्ती अद्यपही खात्यामध्ये जमा करण्यात आलेली नाही.या संदर्भात परभणी येथील समाज कल्याण कार्यालय अधिकार्‍यांशी संपर्क साधला असता ते म्हणाले निधी उपलब्ध नसल्यामुळे शिष्यवृत्ती जमा करण्यात आलेली नाही.काही दिवसांमध्ये    निधी मिळेल त्यानंतर तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येईल.असे तोंडी आश्वासन दिले, आश्वासन देऊन दोन महीने झाले तरीही शिष्यवृत्ती मिळालेली नाही त्यामुळे शैक्षणिक नुकसान होत आहे. संबंधित विभागाने याची दखल घेऊन,शिष्यवृत्तीचा प्रश्‍न लवकरात लवकर सोडवावा अशी मागणी विद्यार्थी व पालकामध्ये होत आहे.

* गतवर्षाची शिष्यवृत्ती अद्यपही मिळाली नाही.
* मागासवर्गीय विद्यार्थी मुख्यमंत्र्यांना भेटणार.
* प्रश्‍न न सुटल्यास आंदोलन.
* विद्यार्थ्यांनचे शैक्षणिक नुकसान.


No comments:

Post a Comment

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात ९८ जणांची सुरक्षा रक्षक पदासाठी निवड

राणीसावरगाव (प्रतिनिधी) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, विद्यार्थी विकास समिती आणि एस. एस. सिक्यु...