Monday, September 18, 2017

सकारात्मक विचारातून विद्यार्थी घडतो: डाॅ. भरते

राणीसावरगाव(कदम प्रणाली, सोनी पवार)
         आपल्या आयुष्यामध्ये सतत सकारात्मक विचार केला पहिजे, या विचारातून विद्यार्थी घडत असतात, असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाचे प्राध्यापक डाॅ. उमेश भरते यांनी केले आहे.
                   पुण्यश्लोक आहील्यादेवी होळकर महाविद्यालयामध्ये मानसशास्त्र विभागाच्या वतीने 'जागतिक आत्महत्या पावृत्त' या विषयावर व्याख्यानाचे  आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष डाॅ. उत्तम देवकत्ते तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. उमेश भरते प्रा. डाॅ. विश्वनाथ रासवे यांची उपस्थितीती होती. यावेळी मानसशास्त्र अभ्यास मंडळाचे उदघाटन व मानसमुद्रा या भित्तीपत्रकाचे विमोचन करण्यात आले. भित्तीपत्रकाचे संपादकीय मंडळ  गंगाधर गव्हाने, सुनील रायबोले, दव बंडगर, रंगनाथ जाधव, पुनम कांबळे, आरती स्वामी, माधुरी सालमोटे, संदीप मोटे, श्रीकन्या कदम आदींची सहभाग होता. यावेळी डाॅ. भरते म्हणाले मानवाला नकारात्मक विचार आल्यानंतर निसर्गाच्या सानिध्यात रमले पाहिजे. तेव्हा मानसिक ताण हरवतो. नविन कल्पना, माहिती आदी सकारात्मक विचार येत असतात असे त्यांनी सांगितले यानंतर डाॅ. उत्तम देवकत्ते यांचे अध्यक्षीय समारोप झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डाॅ. विश्वनाथ रासवे यांनी केले आहे. सूत्रसंचालन डाॅ. नरसिंदास बंग यांनी केले, तर आभार प्रा. विजयकुमार सौन्नर यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आदींनी प्रयत्न केले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात ९८ जणांची सुरक्षा रक्षक पदासाठी निवड

राणीसावरगाव (प्रतिनिधी) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, विद्यार्थी विकास समिती आणि एस. एस. सिक्यु...