Monday, October 2, 2017

राणीसावरगाव येथे ६१ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा.

राणीसावरगाव (मंगेश भालेराव).

   
पंचशिल ध्वजाचे ध्वजारोहन करताना पिंपळदरी
 पोलीस स्टेशनचे स.पो.नि. अविनाश खंदारे
  राणीसावरगाव येथील मैत्रीय बौद्धविहार येथे ६१ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यात आला. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपुर या ठिकाणी, अशोक विजयादशमी च्या दिवशी, मानव कल्यानासाठी मानवतावादी, भारतीय महामानवाने सांगीतलेला, मुळ भारतीय मातीतला, तथागत गौतम बुद्धाचा, बौद्ध धर्म, या दिवशी डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वीकारला ,त्या दिवसामुळे जगभरतातील, बौद्ध बांधव, तो दिवस साजरा करतात.
                                                      मैत्रीय बौद्धविहारा मध्ये, सकाळी ११:oo वाजता, पंचशिल ध्वजाचे ध्वजारोहन पिंपळदरी पोलीस स्टेशनचे, स. पो. नि. अविनाश खंदारे यांच्या हस्ते झाले, व बोधिसत्व डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. बौद्ध उपासक व उपासिका यांनी एकत्रित येऊन विहारा मध्ये सामुहिक रित्या त्रिशरण, पंचशिल, बौद्धवंदना, घेण्यात आली. यानंतर डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला धम्म, यावर व्याख्यानासाठी
तथागत गौतम बुध्द व सम्राट अशोक यावर व्याख्यान
देताना प्रा.डाॅ. बालाजी गव्हाळे
राणीसावरगाव येथील पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर महाविद्यालयाचे पाली विभागप्रमुख प्रा. डाॅ. बालाजी गव्हाळे यांनी बौद्ध धर्म,व सम्राट अशोक यावर विचार मांडले. भारतीय संविधानामध्ये बुद्ध तत्त्वज्ञानाचा प्रभाव आहे,असे ते बोलत होते.या वेळी ते पाली भाषेचे महत्व सांगताना बुद्धाचा इतिहास जाणायचा असेल तर पाली भाषा समजावी लागेल.बुद्ध धम्मातील पंचशीलेला आचरणात आणले पाहिजे, पंचशिलाचे जर पालन केले तर जिवन सार्थक होईल असे ते म्हणाले.  
                या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाबासाहेब रायबोले यांनी केले. तर आभार राहूल बनाटे यांनी मानले. यावेळी या कार्यक्रमास समस्त बौद्ध उपासक व उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी, संजय रायबोले, भुजंग भालेराव, राहुल बनाटे, अर्जुन साळवे, विलास आदोडे, बाबासाहेब रायबोले, माधव रायबोले, मंगेश भालेराव, वैभव आदोडे,आदींनी यावेळी परिश्रम घेतले 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात ९८ जणांची सुरक्षा रक्षक पदासाठी निवड

राणीसावरगाव (प्रतिनिधी) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, विद्यार्थी विकास समिती आणि एस. एस. सिक्यु...