Monday, October 2, 2017

सुखी जिवन जगण्यासाठी पंचशीलाचे पालन केले पाहिजे... प्रा. प्रकाश पांढरे

राणीसावरगांव(वैभव आदोडे)

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात बौध्द साहित्यातील महान व्यक्ती 'अनागारिक धम्मपाल' यांचा जन्मदिन पाली दिवस म्हणून साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उत्तम देवकत्ते हे होते तर प्रमुख पाहुणे तसेच व्याख्याते म्हणून प्रा. प्रकाश पांढरे हे होते.
       कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुध्द यांच्या वंदन गीताने झाली. हे गीत संगीत विभागाच्या विद्यार्थ्यांनी सादर केले. तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक पाली विभागप्रमुख डॉ. बालाजी गव्हाळे आणि प्रा. सारिका केदारे यांनी मांडले. कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते यावेळी बोलताना असे म्हणाले कि, 'मानवाला जर सुखी जिवन जगायचे असेल तर त्याने पंचशील तत्वांचं पालन केलं पाहिजे'.
       या कार्यक्रमाचे औचित्य साधून पाली विभागातील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या भिंतीपत्रकाचे उद् घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीकन्या कदम हिने केले तर आभार डॉ. बालाजी गव्हाळे यांनी मानले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात ९८ जणांची सुरक्षा रक्षक पदासाठी निवड

राणीसावरगाव (प्रतिनिधी) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, विद्यार्थी विकास समिती आणि एस. एस. सिक्यु...