Thursday, November 2, 2017

राणीसावरगांवात येणाऱ्या सर्वच रस्त्याची दुरावस्था

राणीसावरगाव :
गंगाखेड तालुक्यातील राणीसावरगाव अंतर्गत २० ते २५ गाव,वाड्या,तांडे आदींचा राणीसावरगावशी आवक जावक होते. त्यामध्ये १० किलोमीटरच्या आतील एकही रस्ता व्यवस्थित नसुन रस्त्यावर ठिकठिकाणी खाच खळगे, छोटे मोठे खड्डे,गिट्टी उघडी पडलेली दगड धोंडे पावसाने रस्ते खराब झालेले आदीमुळे रस्त्यांचा वापर करताना वाहन चालकांची दमछाक होते. ही ग्रामीण भागाची दैनिय अवस्था झाली आहे. राणीसावरगाव गंगाखेड,
पालम, पिंपळदरी,खंडाळी,मार्गेसांगवी,माळेगाव,चोरवड,मरडसगांव, राणीसावरगाव मार्गे घंटग्रा, किनगाव, परिसरातील आदी रस्त्यावर खड्याचे  साम्राज्य आहे. रस्ता दुरूस्तीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे पुर्णत: दुर्लक्ष आई. वरील रोड रस्त्याची डाग-डुजी खड्डे बुजवने,मुरूम टाकने आदी कामे थातूर मातूर करून लाखो रुपयांचा निधीचा चुराडा वर्षानुवर्षे होतो. अनेक ग्रामस्थ गावकऱ्यांनी वरील प्रतिक्रिया बोलून दाखवल्या आहेत.या संदर्भात सर्व रस्त्याची दुरावस्था थांबवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याची दुरूस्ती मोहीम राबवावी तरच ग्रामस्थांना त्यांच्या हक्काचा रस्ता मिळेल. हीच सार्वजनिक बांधकाम विभागाकडे ग्रामस्थांकडून मागणी होत आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात ९८ जणांची सुरक्षा रक्षक पदासाठी निवड

राणीसावरगाव (प्रतिनिधी) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, विद्यार्थी विकास समिती आणि एस. एस. सिक्यु...