वीस वर्षामध्ये ४५ लघुपट तयार केले आहेत. त्यापैकी एका लघुपटला राज्य पुरस्कार प्राप्त झाला आहे. माझ्या लघुपटाची दखल ऑस्करने घ्यायला पाहिजे. जो पर्यंत ऑस्कर दखल घेणार नाही तो पर्यंत माझे कार्य सुरु राहणार असल्याची माहिती प्रसिध्द दिग्दर्शक गोपी मुंढे यांनी आज येथे दिली.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयामध्ये के. डी. सी. व वृत्तपत्रविद्या विभागाच्या वतीने "लघुचित्रपट कसा करावा" या एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेचे अध्यक्ष उपप्राचर्य उत्तम देवकते, प्रमुख पाहुणे म्हणून लक्ष्मण निळे, डॉ. संतोष हंकारे, प्रा.तुकाराम बोबडे, प्रा.विजयकुमार सोन्नर यांची उपस्थिती होती. यावेळी लघुपट कसा करावा या संदर्भात मार्गदर्शन करताना मुंढे म्हणाले, विद्यार्थ्यामध्ये सामजिक जाणीव असली पाहिजे. विषय हाताळताना घ्यावयाची काळजी, विषयाची निवड, चालू घडामोडी या विषयी माहिती असणे आवश्यक आहे. सध्या स्मार्टफोन कमी किमतीत मिळत आहेत. या मोबाईल वरून लघुपट तयार होऊ शकतो. लघुपट तयार केल्यानंतर तो पुरस्कारासाठी पाठीवणे आवश्यक आहे. लघुपट दर्जेदार असल्यास पुरस्कार प्राप्त होतात. कमीत कमी मिनिटामध्ये जास्तीत जास्त माहिती सांगणे म्हणजेच लघुपट तयार करणे होय. कलावंत काळाला की कलाकृती सादर होत असते. ज्ञान आणि माहिती यातील फरक समजून घेणे आवश्यक आहे. छायाचित्रपटामधून समाज घटना, विविध विषय दाखिविले जाऊ शकतात. त्यातून संदेश समाजापर्यंत पोहचविणे आवश्यक आहे. "स्वच्छ भारत एक स्वप्न" या विषयावर तीन मिनिटाचा लघुचित्रपट तयार केला. या चित्रपटामधून पंतप्रधानाचा संदेश समाजापर्यंत पोहचवला अन त्या चित्रपटामध्ये बारा अर्थ निघत असतात आणि हे दाखवण्याच काम अभ्यासू चित्रपटनिर्माताच करू शकतो. येणाऱ्या भावी तरुणांना चित्रपट करता येऊ शकतो, त्यावर तुमच नाव आणि पैसा मिळू शकते. त्यासाठी नवीन तंत्रज्ञान माहिती अवगत केली पाहिजे,अन हि माहिती इंटरनेटवर उपलब्ध आहे असे त्यांनी सांगितले.यावेळी उपप्राचार्य उत्तम देवकते यांनी मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. बालाजी शिंदे यांनी केले तर आभार प्रा.शंकर घाडगे यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंगेश भालेराव, प्रशांत वाघमारे, गंगाधर गव्हाणे, सुशील तांबरे, ऐश्वर्या पवार ,शीतल बोरगावकर, प्रणाली कदम, समाधान नाटकर यांनी प्रयत्न केले. या कार्यक्रमाला प्रा.सोमनाथ आहिरे, डॉ.काशिनाथ जाधव, प्रकाश बुगणर यांची उपस्थिती होती.

