Thursday, January 11, 2018

चित्रपट निर्मितीत डॉ.विलास दगडे यांचे दिशादर्शक पाउल - प्राचार्य डॉ. दळणर

परभणी (समाधान जाधव )
   
लघुचित्रपटाच्या माध्यमातून चंदेरी दुनियेत पाउल ठेवणे अवगड कार्य आहे. फिल्म इंडस्ट्रीत परभणी सारख्या शहरातून सध्या मोठ्या प्रमाणात आगमन होत असलेले दिसते. चित्रपटाकडे कोणत्या दृष्टीने बघावे हे डॉ. विलास दगडे यांच्या व्हाटसअप्प, रक्षक, दक्षता, रेड बलून, ध्वज आणि कर्तव्ये ह्या सहा विषयाच्या  लघुचित्रपट सिद्ध केले.आर्थिक परिस्थिती अतिशय नाजूक असताना आपले विचार व भावना लोकांसमोर मांडण्यासाठी  शॉट फिलीमच्या माध्यमातून डॉ. विलास दगडे यांचे कार्य मोलाचे आहे. प्रादेशिक आणि हिंदी भाषेतील चित्रपट निर्मीती करीत असताना येणारे संकटे विविध असतात अशा चित्रपट निर्मितीत डॉ. विलास दगडे यांचे दिग्दर्शक पाउल परभणीकरणा दिसते, असे गौरव उदगार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी दळणर यांनी बोलताना व्यक्त   केले.      शिवाजी      महाविद्यालयाच्या 
सभाग्रहात संपन झालेल्या मातोश्री मुव्हीज निर्मित शॉट फिल्म प्रसारण कार्यक्रमात शिवाजी महाविद्यालयाचप्राचार्य डॉ. बाळासाहेब जाधव तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रख्यात नेत्ररोग तज्ञ तथा श्रीराम बागेचे संचालक डॉ. संजय टाकळकर अंतरर्वेली मराठी निर्माते व दिग्दर्शक गफार मास्टर, ज्यांनी अनेक हिंदी, मराठी चित्रपटात फाईट मास्टर म्हणून काम केले. असे रशीद मास्टर होते. मातोश्री मूव्हीजच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे यांचा पुष्पहार देऊन सत्कार केला प्रास्ताविक किसन फटाले यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.सुनील जाधव यांनी केले. तर आभार डॉ. संतोष गोंडेस्वार यांनी मानले. कार्यक्रमाच्या शेवटी सहा विषयाच्या शॉट फिल्म उपस्थित प्रक्षेकांना दाखविण्यात आल्या आहेत. सभाग्रह भरगच्च प्रेक्षकांनि भरले होते. कार्यक्रमासाठी सचिन मोरे, प्रकाश राउत, परमेश्वर बनवे, रणधीरण सरवदे, प्रवीण इंगले, गोविंद कांबळे, विक्की उबाळे, स्नेहा कांगणे, सिमरण कदम, वीणा शर्मा, सिवानी गमे, रोहीणी हाके, पूजा माने, ईश्वर पाटोळे, कपिल भरणे आदींनी विशेष  परिश्रम घेतले.    

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात ९८ जणांची सुरक्षा रक्षक पदासाठी निवड

राणीसावरगाव (प्रतिनिधी) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, विद्यार्थी विकास समिती आणि एस. एस. सिक्यु...