Wednesday, February 21, 2018

होळकर महाविद्यालयात २४६ परीक्षार्थीनी दिली बारावीची परीक्षा

राणीसावरगाव ( मंगेश भालेराव ):

         
     
        महाराष्ट्र राज्यातील व उच्य माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च -२०१८ मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालय राणीसावरगाव येथे बारावी इंग्रजी या विषयाची लेखी परीक्षा  २१ फेब्रुवारी २०१८ रोजी घेण्यात आली. या परीक्षेत २६४ परीक्षार्थीपैकी २४६ परीक्षार्थी हजर होते. यात १८ परीक्षार्थीनि दांडी मारली. कॉपिमुक्त्त वातावरणात सुरळीत परीक्षा सुरु आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात श्री रेणुकादेवी उच्च माध्यमिक विद्यालय, माता रमाई कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयातील एकूण २६४ परीक्षार्थीची नोंद असून भरली. यापैकी २४६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.उर्वरित १८ विद्यार्थ्यांनी परीक्षेला दांडी मारली. विद्यार्थांना पूर्ण तपासून परीक्षा केंद्रावर सोडण्यात
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालय
राणीसावरगाव येथे बारावी इंग्रजी या विषाची लेखी परीक्षा  २१ फेब्रुवारी २०१८ रोजी घेण्यात आली.
आले. कॉपीमुक्त परीक्षा अभियान राबविली जात असल्याची माहिती प्राचार्य डॉ. शिवाजी दळणर यांनी सांगितले.या परीक्षेचे केंद्रसंचालक प्रा. पी. पी. मरेवाड, सहकेंद्रप्रमुख एस.डी. जाधव, बैठे पथकामध्ये एन.के.मुंडे,सौ.व्ही.एस.कुरुडे,सौ.ए.एस. देशमुख यांचा समावेश आहे. यावेळी डॉ. उत्तम देवकते,प्रा.दुल्हेखान पठाण, प्रा.एस.डी. सांगोळे, प्रा. पी.एस. चौधरी यांनी काम पहिले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात ९८ जणांची सुरक्षा रक्षक पदासाठी निवड

राणीसावरगाव (प्रतिनिधी) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, विद्यार्थी विकास समिती आणि एस. एस. सिक्यु...