Wednesday, February 28, 2018

मराठी भाषेत संस्कृती टिकवण्याचे सामर्थ्य - प्रा. डॉ. संतोष हंकारे

राणीसावरगाव (मंगेश भालेराव , गंगाधर गव्हाणे) :
    
भारतातील प्रमुख भाषांपैकी मराठी ही एक प्रमुख भाषा असून, ति आपली मातृभाषा आहे. मानवी मनावर व समाजमनावर संस्कार घडविणारी भाषा म्हणून जगामध्ये तिची ओळख आहे. कारण प्राचीन काळापासून भारतीय संस्कृतीचा अनमोल ठेवा मराठी भाषेनेच जपून ठेवला आहे. म्हणून जगातल्या कोणत्याही भाषेत संस्कृती टिकवण्याचे सामर्थ्य नाही परंतु संस्कृती टिकवण्याचे खरे सामर्थ्य हे आपल्या मराठी भाषेतच आहे, असे प्रतिपादन प्रा. डॉ. संतोष हंकारे यांनी केले.

     पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात आयोजित केलेल्या कवी श्रेष्ठ कुसमाग्रज जन्म दिन मराठी भाषा दिवस या कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी दळणर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य डॉ. उत्तम देवकते हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी कवी श्रेष्ठ कुसमाग्रज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी या गीताचे सामुहिक गायन करण्यात आले. तसेच कवी कुसमाग्रज व मराठी भाषेचा जन्म कसा झाला ? या विषयाचे दोन वीडीयो क्लीप विद्यार्थ्यांना दाखवण्यात आल्या त्यानंतर विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या माय मराठी या भितीपत्रकाचे विमोचन प्रमुख पाहुण्याच्या हस्ते करण्यात आले.


 
     डॉ.हंकारे म्हणाले, “ मराठी भाषेने साहित्याच्या क्षेत्रामध्ये अत्यंत मोलाचे योगदान दिले असून आज ती ज्ञान भाषा झाली आहे. कुसमाग्रज यांनी तिला आपल्या कविता, कादंबरी, नाटक, अशा साहित्याच्या माध्यमातून मराठी भाषेला सन्मान प्राप्त करून दिला आहे. तिला साहित्याची व इतिहासाची किनार लाभल्यामुळे मराठी भाषाही खरी श्रीमंत भाषा आहे संतांचे कीर्तन,भारुड व अभंग, भजन यांनी ति सजली आहे, त्यामुळे ति कधीही नष्ट होणार नाही. तर अनेक भाषा आपल्यामध्ये सामाऊन घेऊन ति विकसीत होणारी क्रांती प्रवत  भाषा आहे असे हि डॉ.हंकारे यांनी सांगितले.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. श्रीहरी चव्हाण यांनी केले तर सूत्रसंचालन आणि आभार हनुमान दळणर या विद्यार्थ्यांनी मानले या कार्यक्रमाला विद्यार्थी व प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात ९८ जणांची सुरक्षा रक्षक पदासाठी निवड

राणीसावरगाव (प्रतिनिधी) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, विद्यार्थी विकास समिती आणि एस. एस. सिक्यु...