Friday, July 27, 2018

तथागत बुद्ध हे जगातील पहिले गुरु - डॉ.बालाजी गव्हाळे

राणीसावरगाव  ( मंगेश भालेराव ): 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयामध्ये पाली विभागाच्या तर्फे गुरुपोर्णिमा हा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.डॉ.बालाजी गव्हाळे हे होते तर पाली विभाग प्रमुख प्रा.सारिका केदार यांची उपस्तिथी होती.महविद्यालयाच्या विद्यार्थांनी गुरुपौर्णिमेनिमित्य डॉ.बालाजी गव्हाळे व प्रा.सारिका केदार यांचे स्वागत केले.या वेळी डॉ.गव्हाळे म्हणाले,'' तथागत बुद्ध यांनी आषाढी गुरु पौर्णिमेच्या मंगल दिनी पंचवर्गीय भिक्षुंना पहिले प्रवचन दिले. आणि त्यांना जगाच्या दुख मुक्तीसाठी त्यांना ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करण्याचे सांगितले तेव्हा पासून आषाढी पोर्णिमा हि गुरु पोर्णिमा म्हणून आपल्या देशात साजरी केली जाते. त्यामुळे तथ्गत सिद्धार्थ गौतम बुद्ध हे जगातील पहिले गुरु ठरतात.त्यामुळे त्यांना  सर्व संतानी भगवान बुद्धाला आपले गुरु मानले आहे. याच बरोबर अनेक संताच्या गाथेमध्ये तथागत भगवान बुद्धाच्या तत्त्वज्ञानाचा प्रभाव असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी प्रा.सारिका केदार यांनी 'धम्मगीत' सादर केले. प्रशांत वाघमारे या विद्यार्थ्याने भगवान बुद्धाचे सुंदर अशी गीत सादर केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन जाधव याने केले तर आभार विद्यार्थी  मंगेश भालेराव यांनी मानले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थीत होते.

No comments:

Post a Comment

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात ९८ जणांची सुरक्षा रक्षक पदासाठी निवड

राणीसावरगाव (प्रतिनिधी) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, विद्यार्थी विकास समिती आणि एस. एस. सिक्यु...