पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने केरळ पूरग्रस्तांना राणीसावरगाव येथे मदत फेरी काढून '११ हजार ८३७' रुपये जमा झाले.हा निधी पूरग्रस्तांसाठी पाठविण्यात आला आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढण्यापूर्वी राष्ट्गीतापासून प्रारंभ केला आहे.राष्ट्रगीता नंतर विद्यार्थी घटंग्रा चौक, देवी बाजारपेठ, मोंढा,पालमरोड
नंतर घटंग्रा चौकातून महाविद्यालयात फेरी आणली.या फेरी मध्ये विद्यार्थ्यांनी दुकान, कर्मचारी, मजदूर, कामगार, शेतकरी, विविध स्तरातून शक्य तेवढी मदत केली. विद्यार्थ्यांनी केरळ पूरग्रस्तांना सढळ हाताने मदत करा, 'भारत माता कि जय अश्या' घोषणा दिल्या. हि फेरी प्राचार्य डॉ.शिवाजी दळणर यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आली आहे,या फेरी चे नियोजन उपप्राचार्य डॉ.उत्तम देवकते, राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक प्रा.अभय पाटील यांच्यासह कनिष्ट आणि वरिष्ठ महाविद्यालयातील
प्राध्यापकांचा सहभाग होता.
No comments:
Post a Comment