समाजाला जिवंत ठेवण्यासाठी डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे विचार महत्वाचे आहेत. त्यांच्या विचाराने देशाची ओळख जगाला झाली असल्याची माहिती प्राचार्य डॉ.शिवाजी दळणर यांनी दिली.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालय व संस्कृत सप्ताह आणि शिक्षक दिनानिमित्य व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.शिवाजी दळणर यांची उपस्थिती होती. तर प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य डॉ.उत्तम देवकते, प्रा.ज्ञानेश्वर खोमणे प्रा.अभय पाटील, कवी साबणे यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी सर्व प्राध्यापकवृंद व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सत्कार केला. यावेळी प्रा.खोमणे म्हणाले,"डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी अध्यानाच्या काळात पुस्तकाला मित्र बनवले. भारतीय संस्कृतीची खरी
ओळख त्यांनी करून दिली. प्राध्यापक ते राष्ट्रपती झाले. त्यांचा कार्यकाळ अतिशय महत्वाचा होता असे त्यांनी सांगितले. प्रा.पाटील विद्यार्थी चंद्रकांत धनगरे, लखन राठोड, हनुमंत दळणर, पूजा राठोड विद्यार्थ्यांनी भाषणे केली. संस्कृत विषयाचे भित्तीपत्रकाचे प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.शंकर घाडगे तर सुत्रसंचलन विद्यार्थी पूनम कांबळे यांनी केले. आभार हनुमान दळणर यांनी मानले. या कार्यक्रमाला शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्तिथी होते.

No comments:
Post a Comment