आईशिवाय मुल जगू शकत नाही तसं मराठी भाषा ही आपली आई आहे. आपण सर्व तिचे मूल आहोत असे प्रतिपादन प्रा.डॉ.आनंद इंजेगावकर यांनी आज येथे केले.
पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील मराठी विभागाच्या वतीने "मराठी भाषा संवर्धन पंधरवडा" च्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. प्रा.डॉ. उत्तम देवकत्ते अध्यक्षस्थानी होते तर व्यासपीठावर प्रा.डॉ.संतोष हंकारे, प्रा.डॉ.श्रीहरी चव्हाण यांची उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते कर्मयोगिनी अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी निबंध स्पर्धेत प्रथम प्रीती कदम, द्वितीय शिवकन्या पौळ, तृतीय शाहू घडे, येणाऱ्या विद्यार्थ्यास अनुक्रमे 501,301,201 रुपये बक्षीस दिले. यावेळी डॉ. इंजेगावकर म्हणाले, मराठी भाषा बोलणाऱ्या माणसांना परिपत्रक काढून शासनाने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा म्हणून साजरी करायला सांगणे ही अभिमानाची बाब नाही. भाषेप्रती आपलं प्रत्येकाचं उत्तरदायित्व आहे. संवाद, संस्कृती, कल्पना यासाठी भाषा आवश्यक आहे. भाषा ही एक संस्कृती आहे की कसा बोलतो यावरून माझी ओळख आहे. मराठी भाषा अडीच हजार ते पाच हजार वर्षांपूर्वीच्या पाली साहित्यातून जन्माला आली आहे. तर ती संस्कृत भाषेपासून जन्माला आलेली नाही. जगामध्ये दहा भाषा प्रमुख असून त्यामध्ये मराठी भाषा ही एक आहे. मराठी भाषा ही वळवावी तशी वळते, पळवावी तशी पळते, ती आपली मराठी भाषा आहे. मराठी भाषा हीच चिन्हांकित भाषा आहे. ज्याला मराठी भाषेतील चिन्हांचा वापर करता येतो. त्यालाच मराठी भाषेची समृद्धी कळते. मराठी ह लोकभाषा असून तर ज्ञानाचे दिवे लावण्यासाठी संत नामदेवांनी मराठी भाषेचा वापर केला, तर राज्यव्यवहार कोश छत्रपती शिवाजी महाराजांनी तयार करून घेतला, महात्मा ज्योतिबा फुले यांनी मराठी भाषेला हजारो शब्द दिले, मराठी भाषिकांनी इतर भाषांमधील शब्द स्वीकारले, इतर भाषांनी मराठी भाषेतील शब्द स्वीकारले नाहीत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
अध्यक्षीय समारोप डॉ.देवकते यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभागाचे प्रमुख डॉ.संतोष हंकारे यांनी तर सूत्रसंचालन प्रा.प्रकाश चौधरी यांनी केले. आभार प्रा.डॉ.श्रीहरी चव्हाण यांनी मानले. कार्यक्रमाला विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांच्यासह वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद हजर होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. सुरेश वऱ्हाड यांनी परिश्रम घेतले.

No comments:
Post a Comment