पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालय राणीसावरगाव व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या संयुक्त संयुक्त विद्यामाने येत्या २३ मार्च २०१९ शनिवार रोजी सकाळी १०:०० ते ५:३० दरम्यान पाच सत्रात "जागतिकीकरण भारतासमोरील आव्हाने व संधी" या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्राचार्य डॉ.शिवाजी दळणर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
राणीसावरगाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील सेमिनार हॉलमध्ये सकाळी दहा वाजता राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन माजी कुलगुरू जनार्दन वाघमारे यांच्या हस्ते होणार आहे. आर. आर. राठोड हे अध्यक्षस्थानी बीजभाषक म्हणून इंदोर येथील डॉ. दिपक कारभारी यांची तर स्वागत प्रमुख म्हणून प्राचार्य शिवाजी दळणर यांची उपस्थिती राहणार आहे. दुसऱ्या सत्रात राज्यशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष विलास आगाव सामाजशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ.एन.टी. कांबळे, मानसशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ.एन.एम. पाळवदे, संगीत अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ.कृष्णा अनवले यांची उपस्थिती राहणार आहे. तिसऱ्या सत्रामध्ये अर्थशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. अरुण तवर, इतिहास अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ.ए.डी.शिंदे, सैनिक शास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ.सी.बी.भंगे, समाजशास्त्र अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ.कृष्णा शेंडे, त्यांची उपस्थिती राहणार आहे. चौथे सत्र हे निरोप समारंभाच असून या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.शिवाजी दळणर तर प्रमुख पाहुणे म्हणून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले,अधिष्ठाता डॉ.जोगेंद्रसिंह बिसेन,अधिष्ठाता डॉ. वसंत भोसले, वैजयंता पाटील,डॉ. वामन जाधव यांची उपस्थिती राहणार आहे. पाचव्या सत्रात प्रमाणपत्राचे वाटप करण्यात येणार असून जास्तीत जास्त प्राध्यापकांनी असे आव्हान समन्वयक डॉ.अंगद गडमे, डॉ.दीपाली पांडे, प्रा. विजयकुमार सोनर, डॉ.रेणुकादास बोनर, डॉ.गणेश माने, डॉ. विश्वनाथ रासवे, प्रा.आनंद घन यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment