जागतिकीकरणाच्या स्पर्धेत आज आपण आपली भाषा टिकवून ठेवली पाहिजे मात्र भाषा म्हणून आपण मराठीला विसरता कामा नये. मराठी भाषा ही खूप श्रीमंत भाषा आहे कारण तिला साहित्य इतिहास याची जशी किनार आहे तसेच ती संतांची वचने, भारुडे,किर्तन,भजन यांनी ती सजलेली आहे. जगातील कोणत्याही भाषेत नाही असे वैभवशाली शब्द भांडार मराठी भाषेत आहे. म्हणून मराठी हि सर्व भाषेत श्रीमंत भाषा आहे. असे प्रतिपादन बालाजी शिंदे यांनी केले ते पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा करण्यात आला, त्याप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. तुकाराम बोबडे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.बालाजी शिंदे तर मराठी विभाग प्रमुख डॉ. संतोष हंकारे डॉ.श्रीहरी चव्हाण हे उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.तसेच माय- मराठी या भित्तीपत्रकाचे विमोचन करण्यात आले व मराठी वाड:मय अभ्यास मंडळाचे विद्यार्थ्याचे स्वागत करण्यात आले. यावेळी डॉ.बालाजी शिंदे म्हणाले,'' तरुणांनी मराठी भाषेचा लिहण्यात बोलण्यात वापर केला पाहिजे. मराठी अभिरुचीवर चार दशकापेक्षा अधिक काळ प्रभाव गाजविणारे श्रेष्ठ प्रतिभावंत कवी नाटककार, कथाकार, कादंबरीकार, म्हणून कवी कुसुमाग्रज यांनी लिखाण केले आहे. त्यांच्या कविता तरुणांना प्रेरणा देणाऱ्या असून त्यांची 'कना' ही कविता युवकांना आज हि स्फूर्ती देणारी असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. संतोष हंकारे यांनीही मराठी भाषेचे महत्व सांगितले. तसेच अध्यक्षीय सामोरोप करताना प्रा.तुकराम बोबडे यांनी मराठी भाषिक म्हणून आपण प्रत्यकांनी मराठी भाषेचे संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करावे असे सांगितले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हनुमान दळणर व आभार शिवराज पवार यांनी मानले या कार्यक्रमाला प्रा. सारिका केदार,प्रा.डॉ.सिंधुताई खंदारे, डॉ.बालाजी गव्हाळे, प्रा.डॉ.नर्सिंगदास बंग, प्रा.सुष्मा लोमटे,प्रा.धस व महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी उपस्थित होते.या कार्यक्रमासाठी मंगेश भालेराव,वैभव आदोडे,अनिल रायबोले, यांनी सहकार्य केले.


No comments:
Post a Comment