बहुराष्ट्रीय कंपनीच्या दबावामुळे शेतकऱ्यांची कर्जमाफी, बी-बियाणाचे दामदुप्पट आणि सबसिडी मिळत नाही. त्याचे नुकसान भारतातील शेतकऱ्यांना व रोजगारांना होत असल्याची माहिती प्रसिद्ध व्याख्याते भूषणकुमार जोरगुलवार यांनी दिली.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात सेमिनार हॉलमध्ये "जागतिकीकरण व भारतातील आव्हाने व संधी" या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अॅड.रंगनाथ राठोड यांची उपस्थिती होती. तर चर्चासत्राचे उद्घाटक म्हणून अर्थशास्त्र मंडळाचे अध्यक्ष डॉ.अरुण तवार, स्वागताध्यक्ष प्राचार्य डॉ.शिवाजी दळणर यांची उपस्थिती होती. "शोध निबंधक स्मरणिकेचे" विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी संपादकीय मंडळ डॉ.अगद गडमे,डॉ. विश्वनाथ रासवे, डॉ गणेश माने, डॉ. आर.वाय. बोनर, प्रा. विजयकुमार सोनर,प्रा.ए.एल. घन. प्रा.डॉ.दीपाली पांडे यांचा समावेश होता. यावेळी जोरगुलवार म्हणाले," जागतिकीकरणात दृष्टी आणि जिद्द असावी लागते.त्यामुळे मानव प्रगत होतात. त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. सामान्य कल्याणकारी योजना देश राबवीत असून भारतातील बाजारपेठा इतर देशांसाठी खुल्या केल्या आहेत. 'चले जाव" ऐवजी "चले आव" म्हणण्याची पाळी येत आहे. त्याचा फायदा होण्याऐवजी नुकसानच भारताला सहन करावा लागत आहे. सरकार साखर कारखान्याला आर्थिक मदत देते परंतु शेतकऱ्यांना आर्थिक मदत का देत नाही असा प्रश्न उपस्थित करून ते म्हणाले," सार्वभौमत्त्व जागतिकीकरण करणाऱ्या संकटावर आला आहे. त्यामुळे देश शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेऊ शकत नाही. उद्योगपतीचे कर्ज रातोरात माफ होते पण शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज भरावा लागतो. हा कुठला न्याय आहे. शेतीच्या मालाला भाव, पेटेंट इत्यादी बाबींचा भाव बहुराष्ट्रीय कंपनी ठरवीत आहे. सध्या तर संसदेमध्ये जागतिकीकरणाची बाजू मांडण्यासाठी दोन प्रतिनिधी द्यावे अशी मागणी होत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यावेळी डॉ. तवार म्हणाले,"जागतिकीकरणाचा व्यवस्थापन करता आलं पाहिजे. सामाजिक कार्य करणे म्हणजे जागतिकीकरण होय शेतकऱ्यांना कर्ज देऊन समस्या सुटत नाहीत तर शेतकऱ्यांच्या उत्पादनाला चांगली बाजारपेठ मिळवून देणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी डॉ.दळणर म्हणाले,"जागतिकीकरणामुळे शिक्षण व्यवस्था बदलत आहे देशातील खेडय़ात राहून प्रदेशातील विद्यापीठाचा विचार करीत आहे. जागतिकीकरणामुळे देश एकत्र जोडले गेले असल्याचे त्यांनी सांगितले.या कार्यक्रमाचे प्रस्ताविक समन्वयक डॉ.अंगद गडमे यांनी केले. तर सूत्रसंचालन प्रा.तुकाराम बोबडे यांनी केले आभार डॉ.विश्वनाथ रासवे यांनी मानले.
दुसऱया सत्रामध्ये व्यासपीठावर समाजशास्त्र अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ.कृष्णा शेंडे, संगीत अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ.कृष्णा अनावले,इतिहास तज्ञ डॉ.अनिल कठारे यांची उपस्थिती होती. यावेळी दहा शोधनिबंध वाचले.या सत्राचे सूत्रसंचलन प्रा.विजयकुमार सोनर यांनी केले तर आभार डॉ.गणेश माने यांनी मानले.समारोपाच्या सत्रात अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ.शिवाजी दळणर यांची उपस्थिती होती. तर व्यासपीठावर डॉ.विद्या चौरपगार, सैनिकशास्त्र अध्यक्ष डॉ.सी.बी.भांगे यांची उपस्थिती होती. मान्यवरांची भाषणे झाली. त्यानंतर डॉ. दिलीप सावंत, डॉ.शीतल बरदाले आदींनी मनोगत व्यक्त केले. या सत्राचे सूत्रसंचलन डॉ संतोष हंकारे तर आभार डॉ विश्वनाथ रासवे यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विध्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी सहकार्य केले.



No comments:
Post a Comment