Wednesday, August 14, 2019

राणीसावरगाव ते करलेवाडी रस्त्याचे डांबरीकरण न केल्यास स्वातंत्र्यदिनी आंदोलन करणार


परभणी (प्रतिनिधी) 
  
गंगाखेड तालुक्यातील राणीसावरगाव ते करलेवाडी रस्त्याची दयनीय अवस्था झाली.या रस्त्याचे डांबरीकरण न केल्यास स्वातंत्र्यदिनी ग्रामस्थ आंदोलन करणार आहेत ,असा इशारा यावेळी दिला.
  राणीसावरगाव पासून करलेवाडी हे गाव पाच किलोमीटर अंतरावर आहे.करले वाडीपासून विलासनगर, उमाटवाडी,डुंबरवाडी, अहिल्यादेवी नगर,पांढरेवाडी, करलेवाडी,गोळवाडी  हि गावे लागत असतात. या परिसरातील राणीसावरगाव ही बाजारपेठ आहे. येथील ग्रामस्थ शेतीसाठी लागणारे साहित्य,  रुग्णालयात उपचारासाठी, माध्यमिक आणि महाविद्यालय शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी मोठ्या संख्येने  ये- जा करीत असतात.रस्ता खराब असल्याच्या कारणामुळे मोटारसायकली चालविताना मोठी कसरत करावी लागते.तसेच रस्ता खराब असल्यामुळे अॅटो चालक खासगी वाहने दाम दुप्पट करून रक्कम वसूल करीत असता। भारत देश स्वातंत्र्य झाल्यानंतर एकदाच या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. तेही निकृष्ट डांबरीकरण करण्यात आले.त्या रस्त्याचा ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागताे. या संदर्भामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जातीने लक्ष घालून राणीसावरगाव ते कारलेवाडी रस्त्याचे डांबरीकरण्यात  करावे अन्यथा स्वातंत्र्यदिनी  आंदोलन केले जाईल.


No comments:

Post a Comment

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात ९८ जणांची सुरक्षा रक्षक पदासाठी निवड

राणीसावरगाव (प्रतिनिधी) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, विद्यार्थी विकास समिती आणि एस. एस. सिक्यु...