राणिसावारगाव
(कृष्णा देवकते)
पु. अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयांमध्ये स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला आहे. पु. अहिल्यादेवी होळकर महविद्यालयांमध्ये गुरुवारी सकाळी ८:०० वाजाता संस्थेचे संचालक डी. डि. एस. गोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले आहे. त्यापूर्वी डी.एस.गोर, संचालक दिगांबर हाके संस्थेचे अध्यक्ष आर. आर. राठोड, उपप्राचार्य डॉ. उत्तम देवकते, शाळेचे मुख्याध्यापक के.एम. रोडे यांनी महात्मा गांधी आणि कर्मयोगीनी अहिल्यादेवी यांच्या प्रतिमेचे पूजन केले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला. त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष राठोड यांनी स्वातंत्र्य दिनाच महत्त्व सांगितले. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ.नरसिंहदास बंग यांनी केले. या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला वरीष्ठ आणी कनीष्ठ तसेच माध्यमिक शाळेतील शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:
Post a Comment