Thursday, August 22, 2019

क्रॉस कंट्री स्पर्धेमध्ये होळकर महाविद्यालयाचा द्वितीय क्रमांक

राणीसावरगाव (चंद्रकांत धनगरे ):-

            पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयाचा आंतरमहाविद्यालयीन  झोन क्रॉस कंट्री स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळाला आहे.
   परभणी येथे शारदा महाविद्यालयांमध्ये नुकताच आंतर महाविद्यालयीन झोन क्रॉस कंट्री स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये अनेक संघांनी सहभाग घेतला. त्यापैकी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील सोपान पिसाळ अंकुश चव्हाण, स्वप्नील ढगे, राहुल हाके, परमेश्वर मुसळे, शिवप्रसाद कांगणे या खेळाडूंनी स्पर्धेत भाग घेतला. त्यांनी दुसरा क्रमांक पटकावला. त्यांना क्रीडा प्राध्यापक डॉ. विठ्ठल डुमणर यांनी मार्गदर्शन केले. विजयी खेळाडूंचे कौतुक संस्थेचे सचिव डॉ. शिवाजी दळणर, उपप्राचार्य डॉ. प्रा. उत्तम देवकते यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापकानी कौतुक केले.

No comments:

Post a Comment

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात ९८ जणांची सुरक्षा रक्षक पदासाठी निवड

राणीसावरगाव (प्रतिनिधी) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, विद्यार्थी विकास समिती आणि एस. एस. सिक्यु...