गंगाखेड (वार्ताहर)
शुद्र जातीत जन्म झाला असला तरी स्वत:च्या दास्यत्वाची तमा न बाळगता स्री असल्याचा अभिमान अंगी बाळगून त्याग आणि भक्तीच्या बळावर विठ्ठलाला आपलसं करणारी प्रसंगी विठ्ठलाला शिव्या देऊन आपल्या नियंत्रणात ठेवणारी संत जनाबाई खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदायाची देण आहे. महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाच्या इतिहासातील संत जनाबाई एक सोनेरी पान आहे. तिच्याशिवाय वारकरी संप्रदायाचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही असे प्रतिपादन प्रा. डॉ. संतोष हंकारे यांनी केले.
संत जनाबाई शिक्षण संस्थेच्या कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयात संत जनाबाई यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.दिनानाथ फुलवाडकर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष अँड.रमेश मोहळकर, सचिव अँड.विजयकुमार शिंदे, सहसचिव वरती बस्वराज स्वामी,यांची उपस्थिती होती. यावेळी डॉ हंकारे म्हणाले संत जनाबाईंची रचना सर्वसामान्य माणसाच्या हृदयाचा ठाव घेणारी आहे. महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायात एक स्त्री कवयित्री म्हणून संत जनाबाईला सर्वात वरचे स्थान आहे, तिच्या जन्म आणि काव्यकर्तृत्वामुळे गंगाखेड आज सा-या भारतात ओळखले जात आहे,असे डॉ. हंकारे यांनी सांगितले. या कार्यक्रमाला प्राचार्य डॉ.बी.एम.धुत, उपप्राचार्य डॉ.दयानंद उजळंबे, उपप्राचार्य डॉ.चंद्रकांत सातपुते हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्राचार्य डॉ धूत यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा.जयश्री पछाडे, यांनी केले.तर आभार प्रा डॉ.सचिन खोकले यांनी मानले. या कार्यक्रमाला विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि प्राध्यापक वर्ग मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

No comments:
Post a Comment