राणीसावरगाव (कृष्णा देवकते): -
कोल्हापूर,सांगली येथील पूरग्रस्तांसाठी १२ हजार रुपये मदत फेरी मधून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने सोमवारी सकाळी १० वाजता राणीसावरगावातुन जमा केली आहे. ही मदत मुख्यमंत्री फंडात जमा करण्यात येणार आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने कोल्हापूर, सांगली येथील पूरग्रस्तांना मदत म्हणून सोमवारी सकाळी १० वाजता महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. उत्तम देवकते, राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक प्रा. अभय पाटील यांच्या नेतृत्वाखाली रॅलीचा शुभारंभ राजीव गांधी आणि पु. होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या रॅलीमध्ये होळकर महाविदयालयातील कनिष्ठ, वरिष्ठ, विद्यार्थी, विद्यार्थीनी, प्राध्यापकवृंद यांचा समावेश होता. ही रॅली महाविद्यालय ते घटंग्रा चौक,गुंजेगाव चौक, कृषी उत्पन्न बाजार समिती, पालम रोड, बसस्थानक,मदिना मार्केट, बाजारपेठ, रेणुकादेवी मंदिर परिसर तेथून ग्रामपंचायत मार्ग होळकर महाविद्यालयात काढण्यात आली. या रॅलीमध्ये गरीब, होतकरू, दुकानचालक, मालक, प्रवासी, राणीसावरगाव वासियांनी सढळ हाताने पूरग्रस्तांना मदत केली. या फेरीतून १२ हजार १ रुपये एवढी रक्कम जमा झाली आहे. ही रक्कम मुख्यमंत्री फंडात जमा करण्यात येणार असल्याची माहिती महाविदयालयाचे उपप्राचार्य उत्तम देवकते यानी दिली. या मदत फेरीचे चित्र संकलन रियाज तांबोळी, कृष्णा देवकते, कृष्णा तुरे, चंद्रकांत धनगरे, मोहम्मद शेख यांनी केले.

No comments:
Post a Comment