राणीसावरगाव (कृष्णा देवकते, संभाजी घाळगीर):-
विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर खेळाकडेही लक्ष दिले पाहिजे. खेळांमधून विद्यार्थी करिअर करू शकतो,अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक संतोष मुपडे यांनी दिली.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयांमध्ये क्रीडा विभागाच्या वतीने मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला.त्यानिमित्त ते बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.विठ्ठल डुमणर यांची उपस्थिती होती. तर प्रमुख वक्ते म्हणून पोलिस उपनिरीक्षक संतोष मुपडे, उपप्राचार्य डॉ. उत्तम देवकते यांची उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते हॉकीचे जादूगर ध्यानचंद व कर्मयोगिनी अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी मुपडे म्हणाले,"मेजर ध्यानचंद यांचा आदर्श विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे.सोयी सुविधा उपलब्ध असून त्याचा फायदा घेऊन विद्यार्थ्यांनी खेळामध्ये करिअर करावे. खेळांमधून करिअर करण्यासाठी जिद्द आणि चिकाटी आवश्यक आहे. खेळाडूंची जिल्हा नव्हे तर जगात ओळख असते .म्हणून अभ्यासाबरोबर कुठलाही एक खेळ निवडणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी प्रा डॉ उत्तम देवकते,डॉ डुमणर यांनी भाषणे केली. मान्यवरांच्या हस्ते खेळाडू प्रा उद्धव होनमने,प्रा दुलहेखान पठाण, तुकाराम बोबडे यांच्यासह विद्यार्थी खेळाडू कबड्डी कृष्णा तुरे तर क्रॉस कंट्रीमध्ये रामेश्वर चव्हाण,नरसिंह बीडगर,परमेश्वर चव्हाण, गोविंद साबळे,अयाज कुरेशी, पद्माकर सुरवसे यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा तुकाराम बोबडे यांनी केले तर सूत्रसंचलन रियाज तांबोळी यांनी केले. तर आभार कृष्णा तुरे यांनी मानले. या कार्यक्रमाचे चित्रीकरण विद्यार्थिनी रुपाली मेकाले हिने केले.या कार्यक्रमाला कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Nice
ReplyDelete