राणीसावरगाव (रियाज
तांबोळी):-
हिंदी देशातील सर्वात
मोठी भाषा असून या भाषेने सतत राष्ट्रीय एकात्मतेचे पोषण केले आहे. भाषेची
व्यक्तीच्या विकासात महत्वाची भूमिका असते. विद्यार्थ्यांनी हिंदी सोबतच सर्व
भाषेचा सन्मान केला पाहिजे, असे प्रतिपादन सहसंचालक डॉ. बळीराम लहाने
यांनी आज येथे केले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी
होळकर महाविद्यालयात हिंदी विभागाच्या वतीने हिंदी दिवस साजरा करण्यात आला त्या प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या
अध्यक्षस्थानी प्र-प्राचार्य डॉ. विठ्ठल डुमनर होते तर सोबत डॉ.उत्तम देवकते, देशपांडे, डॉ.नरसिंगदास बंग
यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते कर्मयोगिनी अहिल्यादेवी होळकर
यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. त्याचबरोबर हिंदी अभ्यास मंडळाचे उद्घाटन करण्यात
आले. यातील सदस्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला त्यात अध्यक्ष कु.
पुजा राठोड, उपाध्यक्ष अंकुश चव्हाण, सचीव कु. संगिता
पौळ, सहसचीव शुभम केजगीर, सदस्य कु.
सरस्वती डोणे, रुपाली मेकाले, पल्लवी पौळ, गजानन माने, हिमांशु पाटील, चंद्रकांत धनगरे
इत्यादिंचा सत्कार केला. या वेळी डॉ. लहाने म्हणाले,” स्पर्धा परीक्षा
देण्यासाठी विद्यार्थ्यांची मानसिकता तयार झाली पाहिजे. सर्वात जास्त स्पर्धेत
परीक्षेमध्ये पास होणाऱ्यांची संख्या एकवीस ते एकतिस या वयोगटातील आहे.
या गटातील विद्यार्थ्यांनी अभ्यास, वाचन, ही सवय लावून
घ्यावी. तुम्ही सुद्धा स्पर्धा परीक्षेमधील यश जिंकू शकता. समस्यांवर रडण्यापेक्षा त्यावर मात करणारा व्यक्ती इतिहास घडवू शकतो.
समस्या या विद्यार्थ्यांच्या आयुष्यात काही करू शकत नाही. वेळ, काळ, ओळखून पावले
टाकली पाहिजेत. महाविद्यालयांमध्ये अत्याधुनिक व्यायामशाळा,संगणक लॅब, सुसज्ज ग्रंथालय
आणि उच्च शिक्षीत प्राध्यापक वृंद उपलब्ध आहे. त्यांचा फायदा विद्यार्थ्यांनी
घेतला पाहिजे. ग्रामीण भागातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयांमध्ये
अनेक सुविधा उपलब्ध आहेत. शहराला लाजवेल असे महाविद्यालय कार्यरत असल्याचे त्यांनी
सांगितले. यावेळी डॉ. उत्तम देवकते यांनी महाविद्यालयाची माहिती आणि कार्यपद्धती
सांगितली. डॉ. नरसिंगदास बंग यांनी हिंदी दिवसाचे महत्व सांगत हिंदीच्या सद्य स्थितीवर
भाष्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इंग्रजी विभागाचे विभागप्रमुख प्रा. तुकाराम
बोबडे यांनी केले तर आभार विभाग प्रमुख डॉ. नरसिंगदास बंग यांनी मानले. या
कार्यक्रमाचे चित्र संकलन रियाज तांबोळी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी
डॉ. जाधव के. के., डॉ. बालाजी शिंदे, प्रा. रमेश
नरहीरे, प्रा. राठोड पी. आर. आदिंनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला
कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी आणि प्राध्यापक मोठ्या संख्येने
उपस्थित होते.
No comments:
Post a Comment