राणीसावरगाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी कोरोना विषाणूंचा लढ्यासाठी एक दिवसाचे वेतन एक लाख रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहाय्यताला दिला आहे.
देशात नव्हे तर जगात कोरोनानी हाहाकार माजविला आहे. या आजारावर मात करण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयाचे सचिव कृष्णा भैय्या दळणर यांनी पुढाकार घेऊन एक लाख रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिला आहे. देशावर असे काही संकट आले की पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर महाविद्यालय कधीही मदत करीत असतो. यावेळीही महाविद्यालयाने पुढाकार घेऊन अशीच मदत केली असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.

No comments:
Post a Comment