राणीसावरगाव/प्रतिनिधी
विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले पाहिजेत. शिक्षणाशिवाय आर्थिक-सामाजिक यांचा विकास होत नाही. प्रत्येक विद्यार्थ्यांनी काळाची पावले ओळखून उच्च शिक्षण घेतले पाहिजेत, असे प्रतिपादन आदर्श शिक्षक तुळशीराम सासणे यांनी केले. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पदवी प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. प्राचार्य डॉ. उत्तम देवकते हे अध्यक्षस्थानी होते तर व्यासपीठावर परीक्षा प्रमुख डॉ. बालाजी शिंदे, डॉ. विठ्ठल डुमनर, डॉ.संतोष हंकारे, डॉ.नरसिंग बग, प्रा. अभय पाटील यांची उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते स्वामी रामानंद तीर्थ व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले.संगीत विभागांकडून विद्यापीठ गीत सादर करण्यात आले.
या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप डॉ. उत्तम देवकते म्हणाले," कोरोणाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन शासनाच्या नियमानुसार पदवी वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. हा कार्यक्रम आमच्या व विद्यार्थ्यांच्या स्मरणात राहील असाच हा कार्यक्रम झालेला आहे,असेही त्यांनी सांगितले. यावेळी मंगेश भुजंग भालेराव, सोनी रोहिदास पवार,वैभव गणपत आदोडे, अनिल केरबा रायबोले,कृष्णा रामेश्वर सोनसळे, अंकुश दत्ताराव भोसले, समाधान संदीपान नाटकर, हनुमानसिंग गणेशसिंग ठाकूर यांना मान्यवरांच्या हस्ते पदवी वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन पाली विभागाचे डॉ. बालाजी गव्हाळे तर डॉ. संतोष हंकारे यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला विद्यार्थी आणि वरिष्ठ, कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्म-यांरी हजर होते.



No comments:
Post a Comment