Wednesday, November 4, 2020

होळकर महाविद्यालयातील नऊ विद्यार्थ्यांची सैनिकात निवड

 परभणी( प्रतिनिधी) ;- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील नऊ विद्यार्थ्यांची सैनिकात निवड करण्यात आली आहे. त्या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. शिवाजीराव दळणर, सचिव  कृष्णा भैय्या शिवाजीराव दळणर, प्राचार्य डॉ. उत्तम देवकते यांनी कौतुक केले आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील विविध पदावर पाचशे ते साडेपाचशे  विद्यार्थी नोकरीला लागले आहेत.यात सैनिक, पोलीस,पीएसआय,तलाठी, ग्रामसेवक, प्राध्यापक इत्यादी पदांवर कार्यरत आहेत. वीस वर्षांच्या कालावधीमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी नोकरीला लागले आहेत. महाविद्यालयात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे वर्ग, प्रशिक्षण, क्रीडांगणांची मोफत सेवा  विद्यार्थ्यांसाठी दिली जाते. त्याचा फायदा विद्यार्थ्यी घेत आहेत.परभणी येथील सैन्य भरती मेळाव्यात  नऊ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये मुंजाभाऊ रवींद्र सातपुते,विशाल शिवाजी सातपुते,तुकाराम डिगांबर भोसले, विजय राठोड,ज्ञानोबा दादाराव भोसले, विजय शिवाजीराव भोसले हे इसाद येथील आहेत.  तर अमर दिगंबर पवार, लहु ज्ञानदेव चव्हाण कुंडगीरवाडी, राहुल हाके  यांची सैन्यदलात निवड करण्यात आलेली आहे. त्यांच्या निवडीबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात ९८ जणांची सुरक्षा रक्षक पदासाठी निवड

राणीसावरगाव (प्रतिनिधी) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, विद्यार्थी विकास समिती आणि एस. एस. सिक्यु...