राणीसावरगाव ( प्रतिनिधी ):- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालय, राणीसावरगाव आयोजित आंतर महाविद्यालयीन 'ड' झोन कुस्ती स्पर्धा संपन्न झाल्या आहेत.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उत्तम देवकते यांची उपस्थिती होती तर प्रमुख उपस्थिती म्हणून संस्थेचे सचिव कृष्णाभैया शिवाजीराव दळणर,आंतर महाविद्यालयीन "ड" झोनचे अध्यक्ष डॉ. मीनानाथ गोमचाळे,नारायण वाघमारे महाविद्यालय आखाडा बाळापूर, परभणी तालीम संघाचे सचिव डॉ. माधव शेजुळ, महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे तांत्रिक सचिव डॉ. बंकट यादव यांची उपस्थिती होती. या वेळी मान्यवरांच्या हस्ते हनुमान, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, स्वामी रामानंद तीर्थ, प्राचार्य डॉ शिवाजीराव दळणर यांच्या प्रतिमेचे पूजन केले. मान्यवरांचा सत्कार करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. ९ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी १०:०० ते ५ :०० या दरम्यान कुस्ती घेण्यात आल्या आहेत. विद्यापीठ अंतर्गत १३ महाविद्यालयातील १८ कुस्तीगिरांनी सहभाग नोंदविला. या कुस्तीत ५७ गटामध्ये प्रथम-भूजल खंदारे, गुरुबुद्धी महाविद्यालय पूर्णा, द्वितीय शेख असलम, शिवाजी महाविद्यालय परभणी, ६१ गटात: प्रथम- हनुमान जोगदंड, योगानंद महाविद्यालय वसमत, द्वितीय- लक्ष्मण श्रावणे, विठ्ठला महाविद्यालय लोणी,
६५ गटात: प्रथम-गोपाल बिडगर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालय राणीसावरगाव, द्वितीय- कृष्णाकांत देशमुख, नागनाथ महाविद्यालय औंढा, ७० गटात: प्रथम- शरद सुके, संत तुकाराम महाविद्यालय परभणी, द्वितीय -ज्ञानेश्वर देवकते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालय राणीसावरगाव,७४ गटामध्ये: प्रथम-रत्नदीप ज्ञानोबा खुणे, शिवाजी महाविद्यालय परभणी, ७९ गटामध्ये :प्रथम -पांडुरंग श्रावणे विठ्ठला महाविद्यालय लोणी, द्वितीय- रामप्रसाद सावळे, शिवाजी महाविद्यालय हिंगोली, ८६ गटामध्ये: प्रथम- सचिन देशमुख माधवराव पाटील महाविद्यालय पालम, ९२ गटामध्ये : प्रथम -अल जिलानी हबीब माधवराव पाटील महाविद्यालय पालम, ९७ गटात: प्रथम-अजिंक्य लुंगे शिवाजी महाविद्यालय हिंगोली, १२५ गटामध्ये :प्रथम -हरिष चौधरी आदर्श महाविद्यालय हिंगोली, वरील लढत ही अटीतटीची झाली आहे. निवड समितीत प्रा. डॉ. बंकट यादव, डॉ. चंद्रकांत सातपुते,डॉ. विठ्ठल डूमणर यांनी काम पाहिले. विजय कुस्तीपटूंचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. विठ्ठल डुमणर यांनी केले तर सूत्रसंचलन व आभार इंग्रजी विभागाचे विभागप्रमुख डॉ. तुकाराम बोबडे यांनी मांनले. या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.
No comments:
Post a Comment