Monday, December 20, 2021

प्राचार्य स्व. डॉ. शिवाजीराव दळणर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम

 राणीसावरगांव (संतोश मेकाले,विषाल चाफेकानडे, पंकज भालेराव):-  पुण्यशोल्क अहिल्यादेवी होळकर शिक्षण संस्थेचे सचिव तथा महाविद्यालयाचे प्राचार्य स्व. डॉ. शिवाजीराव दळणर यांच्या जयंतीनिमत्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्राचार्य डॉ. शिवाजीराव दळणर स्मूतिगौरव सोहळा कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अँड.रंगनाथराव राठोड यांची उपस्थिती होती.

तर प्रमूख मार्गदर्शक म्हणुन माजी प्राचार्य दिनानाथ फुलवाडकर, दिंगांबर हाके, संस्थेचे सचिव कृष्णाभैय्या शिवाजीराव दळणर, मधुमाला दळणर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उत्तम देवकते यांची उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या  हस्ते डॉ. शिवाजीराव दळणर यांच्या प्रतिमेचे पुजन करून कार्यक्रमाला सुरूवात केली. यावेळी प्रा.प्रकाश नानोर, प्रा. ज्ञानेश्वर खोमणे,  डॉ.संतोश हंकारे,  डॉ.दिनानाथ फुलवाडकर, अँड रंगनाथराव राठोड यांनी आपले मनोगत व्यक्त  केले. तसेच इयत्ता 12 वी मध्ये शिकत असलेल्या रूपाली गवळे, दिपाली गवळे यांना शालेय कपडे देवुन सत्कार करण्यात आला. तसेच शकुतला गणेश राठोड, आदित्य संतोश शिदेअश्विनी ज्ञानोबा डोईफोडे, संग्राम गणेश पांढरे, धनश्री संग्राम हुलगुंडेनागेस आभास राठोड, ऋतुजा माधव फुगनर, वैश्णवी कचरू खांडेकरयश इंद्रजित धुळगुंडे, महेश माधव पवार, संचिता मारोती धरणे, संगिता मारोती कोरे, अनिकेत हरिभाऊ कदम, आरूण उत्तम राठोड, समृध्दी सुग्रीव हाके, शाम तोलबा दळणर, मयुरी सखाराम नागरगोजे. सोपान पिंटु चव्हाण, साक्षी मारोती साळवे,पवन रमाजी हाके, शंकर सर्जेराव खांडेकर, श्रध्दा संतोश पाटील, स्वाती नृसिंह पौळ, आक्षय शिवाजी पवार आदी गरिब व अनाथ विदयार्थाना वहया, पेन,सायकली वाटप करण्यात आल्या आहे, तसेच खेळाडु ज्ञानेश्वर देवकत्ते, गोपाळ बिडगर, बजरंग बिडगर, प्रभाकर हाके यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला आहे. या  कार्यक्रमाचे सुत्रसंचलन इंग्रजी विभागाचे विभाग प्रमुख डॉ.तुकाराम बोबडे यांनी केले तर आभार राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. विजयकुमार सोन्नर यांनी मांडले. या कार्यक्रमाला विदयार्थी,पालक, शिक्षक, शिक्षकतर कर्मचारी  मोठया संखेने उपस्थित  होते.












No comments:

Post a Comment

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात ९८ जणांची सुरक्षा रक्षक पदासाठी निवड

राणीसावरगाव (प्रतिनिधी) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, विद्यार्थी विकास समिती आणि एस. एस. सिक्यु...