परभणी (प्रतिनिधी):- महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात "करियर कट्टा" चे उद्घाटन मोठ्या थाटामाटात झाले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उत्तम देवकते तर प्रमुख मार्गदर्शक व उद्घाटक म्हणून महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे अध्यक्ष यशवंत शितोळे, परभणी जिल्हा समन्वयक डॉ.रामानंद व्यवहारे, महाविद्यालयाचे समन्वयक डॉ. अंगद गडमे यांची उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि प्राचार्य डॉ. शिवाजी दळणर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना यशवंत शितोळे म्हणाले," करिअर कट्टा हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी असून या उपक्रमात विद्यार्थ्यांना करियर करण्याच्या विविध संधी उपलब्ध आहेत.स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करताना विद्यार्थ्यासाठी आय.ए.एस. आपल्या भेटीला हा उपक्रम आहे. विद्यार्थ्यांनी या उपक्रमातून स्पर्धात्मक परीक्षेची तयारी केली पाहिजे. स्पर्धा परीक्षांची तयारी करत असतानाच आपला बी प्लॅनही तयार ठेवणे आवश्यक आहे. या बी प्लॅन ची तयारी उद्योजक आपल्या भेटीला या उपक्रमातून करता येते. त्याचबरोबर भारतीय संविधानाचे पारायण, वृत्तवेध स्पर्धा परीक्षा यासारखे उपक्रम विद्यार्थ्यांना करिअर करण्यासाठी निर्माण करण्यात आले आहेत. यावेळी
परभणी जिल्हा समन्वयक
डॉ. रामानंद व्यवहारे
यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या
कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उत्तम
देवकते यांनी करियर कट्टा
हा उपक्रम अत्यंत
चांगला असून करियर कट्टा या
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त संख्येने
सहभागी होण्याचे आवाहन केले. या
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे समन्वयक प्रा.
डॉ. अंगद गडमे
यांनी केले. तर
सूत्रसंचालन प्रा. डॉ. तुकाराम
बोबडे यांनी केले.
व मान्यवरांचे
आभार डॉ. संतोष
हंकारे यांनी मानले. या प्रसंगी
महाविद्यालयातील प्राध्यापक विद्यार्थी मोठ्या
संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी
प्रा. डॉ. बालाजी शिंदे
व व सर्व
सहकारी यांनी प्रयत्न केले.
No comments:
Post a Comment