राणीसावरगाव (राहुल चव्हाण,संतोष मेकाले) आजचा युवा वर्ग सोशल मीडियावर जास्त दिसतो. त्यापैकी क्रांती सावित्रीबाई फुले यांचा विचार विद्यार्थ्यांनी आत्मसात केल्यास नवी क्रांती घडू शकेल, असे प्रतिपादन मराठी विभागाचे प्रमुख डॉ. संतोष हंकारे यांने केले.
राष्ट्रीय सेवा योजना आणि महिला विकास समिती यांच्यावतीने सावित्रीबाई फुले जयंती आणि बालक दिन सोमवारी साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.उत्तम देवकते यांची उपस्थिती होती. प्रमुख पाहुणे म्हणून मराठी विभागाचे डॉ.संतोष हंकारे,शाहीर मिलिंद साळवे,राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक डॉ.वसंत सरवदे यांची उपस्थिती होती.यावेळी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. मान्यवरांनी क्रांती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी मान्यवरांची भाषणे झाली.कार्यक्रमाचे प्रस्ताविक विजयकुमार सोन्नर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भूगोल विभागाच्या प्रमुख डॉ.सिंधु खंदारे यांनी केले.तर कार्यक्रमाचे आभार डॉ.वसंत सरवदे यांनी मानले. या कार्यक्रमाला विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment