Monday, October 17, 2022

होळकर महाविद्यालयात राष्ट्रीय चर्चासत्र संपन्न

 राणीसावरगांव (प्रतिनिधी):-  स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील इतिहास, राज्यशास्त्र, लोकप्रशासन, सैनिकशास्त्र विभागाच्या वतीने स्वातंत्रयोतर भारताचा इतिहास सामाजिक परिणामकता या विषयावर एक दिवशीय आंतरविद्याशाखीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्राला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला आहेया कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. आनंद घन हे उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे उदघाटक श्रमजीवी समाज कल्याण मंडळाचे सचिव कृष्णा भैया शिवाजीराव दळणर, बीजभाषक म्हणुन वैजयंत चिकबसे, कंधार येथील शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य जी.आर.पगडे यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ. गणेश माने यांनी केले. तर सुत्रसंचलन डॉ. विजयकुमार सोन्नर, आभार डॉ. वसंत सरवदे यांनी मानले. याचर्चासत्रात ५५ प्राध्यापकांनी सहभाग घेतला.

No comments:

Post a Comment

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात ९८ जणांची सुरक्षा रक्षक पदासाठी निवड

राणीसावरगाव (प्रतिनिधी) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, विद्यार्थी विकास समिती आणि एस. एस. सिक्यु...